खासदार प्रताप पाटील चिखलीकर नांदेड जिल्ह्याचे स्वयंघोषित भाग्यविधाते! खोटे बोल पण रेटून बोल…. आता खपवून घेणार नाही: आ. शामसुंदर शिंदे यांनी पत्रपरिषदेत खासदार चिखलीकर यांच्यावर साधला निशाणा…!


 लोहा/कंधार (प्रतिनिधी )

नांदेडचे स्वयंघोषित भाग्यविधाते तथा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात काय दिवे लावले आहेत हे लोहा व कंधार तालुक्यातील जनतेला माहीत असून रिसनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मी मंजूर करून आणले असल्याचा खोटा आव खासदार चिखलीकर यांनी प्रसिद्धी माध्यमातून व लोहा शहरात पोस्टर, बॅनरबाजी करून खोटे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार  येथे पत्खारकार परीषदेत केले.

ते पुढे  म्हणाले  की खासदार चिखलीकर लोहा, कंधार तालुक्यातील जनतेसोबत खोटेनाटे लांडी लबाडी करून लोहा, कंधार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला किती दिवस खोटे नाटे बोलणार असून खासदार चिखलीकर यांनी स्वतःची कर्मभूमी असलेल्या चिखली गावला विकासापासून कोसो दूर ठेवले असून जो स्वयंघोषित लोकनेते, जिल्ह्याचा भाग्यविधाता म्हणून नांदेड जिल्ह्यात मिरवतो आहे अशी संतप्त टीका आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी मी स्वतः आमदार या नात्याने नगर विकास विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून व मंत्रालय स्तरावर प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केलेला आहे, पण लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी पत्रपरिषदेत आमदार शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केलेला नसल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात असून जो नगराध्यक्ष लबाड, स्वयंघोषित भाग्यविधाताच्या, मार्गदर्शनाखाली माझ्यावर खोटेनाटे आरोप करतो या नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात लोहा शहरा मध्ये कोणकोणते काळे दिवे लावले आहेत हे लोह्यातील सर्व जनतेस माहित आहे. 

एक आमदार म्हणून कुठल्याही पक्षाचा आमदार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या निधी ला विरोध करूच शकत नसल्याचेही आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले .खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत किती काळे दिवे लावले आहेत हे नांदेड जिल्ह्यतील सर्व सामान्य जनतेला  माहित आहे .


खोटेनाटे बोलणे भपकेबाजी ,भंपक बाजी करून लोहा ,कंधार तालुक्यातील जनतेची दिशाभूल करणे हा  ,खासदार  प्रताप पाटील चिखलीकर यांचा जन्मजात पिंड असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली .लोहा ,कंधार तालुक्यातील जनतेची खोटेनाटे, भपकेबाजी करून दिशाभूल करणे थांबवा.
 ,, चार कार्यकर्त्यांच्या कानात फूस घालून सांगितल्याने लोकनेता भाग्यविधाता होत नसल्याचेही आमदार शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.  खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वयंघोषित, भाग्यविधाते  म्हणून जिल्ह्यात, मिरवतात, नांदेड जिल्ह्यतील बाकी 6 मतदारसंघात खासदार म्हणून काय दिवे लावले आहेत हे सर्वांना माहीत आहे.


स्वयंघोषित भाग्यविधाते, खासदार चिखलीकर यांनी सर्वप्रथम लोहा ,कंधार तालुक्यातील जनतेला व नांदेड जिल्ह्यातील जनतेला खरे, सत्य बोलण्याचा व सत्य काम करण्याचा प्रयत्न करावा व माझ्यावर खोटेनाटे आरोप करू नयेत असा संतप्त इशारा आमदार शिंदे यांनी चिखलीकर यांना लगावला. 
मेहरबानी समजा की सध्या सभाग्रहाचे अधिवेशन चालू नसून अधिवेशन चालू असेले तर खासदार चिखलीकर यांनी घेतलेल्या सर्व खोट्या नाट्य ,भपकेबाज श्रेयावर हक्कभंग आणणार असल्याची माहिती  पत्र परिषदेत आमदार शामसुंदर शिंदे यांनी दिली .

यावेळी पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे,कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील  चोंडे,उपसभापती अरुण पाटील कदम,  माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, युवा नेते रोहित पाटील शिंदे  सह बहुसंख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत ,किवला, रिसनगाव, माळेगाव व कंधार तालुक्यातील कवठा या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा तसेच लोहा तालुक्यातील दापशेड, कांजाळा, बेट सांगवी, कलंबर खुर्द व कंधार तालुक्यातील कोटबाजार, सावरगाव. नि या ठिकाणच्या उपकेंद्राचा सन 2001 च्या लोकसंख्येच्या आधारे दिनांक 17 जानेवारी 2013 च्या लोकसंख्या वर आधारित नवीन आरोग्य केंद्र सुरू करणे अथवा कार्यान्वित असलेल्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी प्रस्तावित जोड आराखडा कार्यान्वित करण्यात आला नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 12 ऑक्टोबर 2020 च्या पत्रकान्वये लोहा ,कंधार मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांना कळवण्यात आले होते.
आमदार शामसुंदर शिंदे यांनी आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्याच अधिवेशनातलोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी व लोहा नगर परिषदेच्या रस्ता अनुदान मंजूर झालेल्या कामावरील स्थगिती उठविण्यासाठी दिनांक 12  2020 च्या पत्रान्वये केलेला होता व प्रथम अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला होता.


माळेगाव लिंबोटी धरणासाठी ही अधिवेशनात आमदार शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.19 /2019व 12 ऑक्टोबर 2020 रोजी च्या पत्रान्वये  नगर विकास मंत्री राम शिंदे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन लोहा शहरातील विशेष रस्ता अनुदान अंतर्गत मंजूर झालेल्या लोहा शहरातील रस्त्याच्या कामावर स्थगिती उठविण्यासाठी पत्रव्यवहार केल्यामुळे नगरपरिषदेच्या रस्ता अनुदानावरील स्थगिती उठवण्यात आल्याचे आमदार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *