बारूळ येथिल संत नामदेव महाराज मठसंस्थानच्या वतीने dysp पदी निवड झालेले विशवनाथ पा. वडजे यांचा सत्कार व एकादशी अमावस्या पंगत सोहळा संपन्न


कंधार ; दिगांबर वाघमारे

  वारकऱ्यांसाठी अधिक मासानिमित्त पंगत कार्यक्रम दिनांक 16 रोजी सकाळी सात वाजता  संत नामदेव महाराज मठ संस्थान बारुळ येथे संपन्न झाला .दिवसभर प्रसाद म्हणून एकादशी व अमावस्येला संस्थांच्या वतीने पंगत असते .तसेच दररोज देखील भक्तांना प्रसाद म्हणून जेवण दिल्या जाते अशी माहिती संत नामदेव महाराज बारुळ मठाधिपती संत नामदेव महाराज मठ संस्थान यांनी दिली आहे.

dysp पदी निवड  झाल्याबद्दल विशवनाथ दिगांबर पाटील वडजे यांचा मठाच्या वतीने सत्कार 

बारुळ नगरी तील श्री. दिगांबर पाटील वडजे यांचे चिरंजीव श्री. विशवनाथ दिगांबर पाटील वडजे यांची राज्यसेवा 2019 मार्फत dysp पदी निवड झाली त्या अनुषंगाने  दिनांक 15-10-2020रोजी संत श्री.नामदेव महाराज मठ संस्थान बारुळ येथे आशीर्वाद घेण्यासाठी आले असता. त्यांचा संत श्री नामदेव महाराज वतीने व  गावकरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी दिगांबर पाटील वडजे, विठ्ठल सा. राचेवाड, मधुकर पा. मारतले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *