लोहयात हथरथ प्रकरणी शांततेत कॅण्डल मार्च काढणाऱ्या भीम सैनिकांवर हल्ला करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव राहिंज यांना निलंबित करण्याच्या व खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी लोहा पोलीस स्टेशन समोर आंबेडकरी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन

लोहा / प्रतिनिधी


उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व हत्याप्रकरणी संपूर्ण भारतभर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी तीव्र पडसाद उमटले असताना या प्रकरणी लोहयात सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी व निर्भयाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 5 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान कॅन्डल मार्च लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आले असता व उत्तर प्रदेश सरकारचा व उत्तर प्रदेश पोलिसांचा निषेध केला असता लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव ज्ञानोबा राहिंज यांनी रॅली मध्ये घुसून भीम सैनिकांवर अमानुष लाठीहल्ला करून लोहा पोलिसात 353 चा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी लोहयात सर्वपक्षीय आंबेडकरी संघटनेच्यावतीने शहरात रॅली काढून लोहा पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन करून लोहा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल महादेव ज्ञानोबा राहिंज बक्कल नंबर 31 59 यांना निलंबित करण्यात यावे.
हाथरस प्रकरणी कॅन्डल मार्च मधील सहभागी असलेल्या त्या भिम सैनिकावर जाणून-बुजून खोडसाळपणाने 353 कलमाखाली खोटा गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करून धरणे आंदोलन करण्यात आले व लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये म्हणाले की सदरील प्रकाराची चौकशी करून दोषी आढळल्यास पोलीस कॉन्स्टेबल महादेव ज्ञानोबा राहिंज याच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठाकडे अहवाल पाठवण्यात येईल.
या धरणे आंदोलनात रिपाईचे मराठवाडा नेते मा. नगरसेवक बबनराव निर्मले, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव महाबळे ,

भारिपचे मा.अ. नगरसेवक बालाजी खिल्लारे, नगरसेविका सौ. शारदाताई बबनराव निर्मले , माजी नगरसेवक उत्तमराव महाबळे , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे , रिपब्लिकन सेनेचे अनिलदादा गायकवाड , स्वाभिमानी भिम सेनेचे विलास सावळे, संतोष तोंडारे, युवा नेते यशपाल निर्मले, जयपाल निर्मले , युवानेते केतन खिलारे , बंटी सावंत , सचिन आढाव , आनंदा गवारे , यांच्यासहित मोठ्याप्रमाणात भीमसैनिक व महिलावर्ग उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *