लोहा ;प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्य महीला उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर लोहा शहरात प्रथमच त्यांचे आगमन झाले.या मुळे नगरसेवक दत्ता वाले यांच्या वतीने जोरदार फटाक्यांच्या आतीषबाजी करण्यात आली. शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानी सांगितले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी दिली आहे. या बद्दल मी सर्वांची आभारी आहे.जी जिम्मेदारी दिली आहे ती मी तुम्हा सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लोहा म्हणजे माझे माहेर घर आहे आणि माझ्या माहेरी तुम्ही सर्वांनी आज जो माझा सत्कार केला आहे.
यामुळे मला काम करण्यासाठी आणखी ऊर्जा मिळाली आहे यामुळे मी तुमच्या सर्वांची आभारी आहे.यावेळी उपस्थित माजी नगर अध्यक्ष किरण वटमवार, उपानगराध्यक्ष शरद पवार , गटनेते करीम शेख, नगरसेवक दत्ता वाले ,नबी शेख ,संदीप दंमकोडवार, भास्कर पवार, नारायण यलरवाड, अमोल व्यवहारे , बालाजी शेळके , कॄषी उत्पन बाजार समितीचे संचालक अकुंश पाटील ,बाळु पाटील गवते, केशव पवार, बंडु वडजे, विजय केंद्रे ,अनिल धुतमल, भानुदास पवार, गोवर्धन पवार ,मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.