नांदेड ;
मराठा सेवा संघ प्रणित राजश्री शाहू शिक्षण परिषदेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गणेश जाधव पारवेकर यांची निवड करण्यात आली असुन त्यांच्या निवडीचे पत्र मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, श्यामसुंदर शिंदे नायगावकर यांनी जारी केले आहे. यावेळी मराठा सेवा संघाचे तेलंगणा प्रभारी प्रा डॉ गणेश शिंदे, ॲड सतीश जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष डॉ विद्याताई पाटील, अरुणाताई जाधव, डॉ. सोपान क्षिरसागर उपस्थित होते.
अभ्यासू व्यक्तिमत्त्व ही ओळख असलेले गणेश जाधव मागील पंचवीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी राहतात. त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरु लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच, सुप्रसिध्द वक्ते, जनप्रिय स्तंभलेखक विद्यार्थीह्रदयसम्राट पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक इंजि. शिवाजीराजे पाटील बाभळीकर,
व्हिबिव्हिपीचे राष्ट्रीय सचिव प्रा. अरविंद तावरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. तुषार देशमुख, संगमेश्वर लांडगे, सुधिर अंबेकर, बाबुराव पवळे, अरुण बार्हाळे, अनिल मुसळे, विनायक रेड्डी दोंगाले, रामेश्वर ब्याळे यांच्यासह असंख्य मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.