कंधार लोहा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या स्वावलंबांसाठी मतदार संघात दुधडेरीसह रोजगार देणारे उद्योग उभारणार–आमदार शामसुंदर शिंदे


कंधार ;- 

माझ्या कंधार लोहा मतदार संघातील  शेतकरी स्वावलंबी बनला पाहीजे पाहिजे यासाठी दररोज उत्पन्न देणारे व शेतीच्या कच्यामालवर प्रकिया करणारे उद्योग, दुधडेरी,फलभाज्या पालेभाज्या  व सिंचन सुविधा वाढवण्याच्या कामावर  भर देणार असल्याचे प्रतिपादन लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार येथे केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार जि. नांदेड व दि. महाराष्ट्र को-ऑफ मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत हमीभावाने धान्य उडीद,मूग,सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी आ. श्यामसुंदर शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाचे उदघाटक- नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीनजी इटनकर तरकार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या -सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,विशेष अतिथी- श्रीमती वर्षा ठाकूर(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड),

डाॅ अमोल यादव जिल्हा उपनिबंधक, मा विजय चव्हाण तहसीलदार, जी आर कौरवार सहाय्यक निबंधक कंधार जि. प.सदस्य चंद्रसेन पाटील, सौ लक्ष्मीबाई घोरबांड सभापती पं, स, माजी जि प सदश्य रावसाहेब पा शिंदे, श्याम अण्णा पवार,नगरसेवक जीवन चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष कंधार सलाम साहेब, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे,उपसभापती अरुण पा.कदम,सर्व संचालक सबधित अधिकारी निमंत्रित कार्यकर्ते, शेतकरी व पत्रकार उपस्थित होते.


या वेळी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या वतीने व्यासपीठावर उपस्थिताचा, पत्रकारांचा यथोचित सक्तार करण्यात आला, या वेळी, सामाजिक कार्यकर्त्यां सौ आशाबाई शिंदे यांनी शेतकरी जगला पाहिजे असे काम करण्यासाठी मी पुर्ण वेळ मतदार संघात गावा गावात भेटुन समस्या सोडवण्याच काम चालू आहे, साहेब आमदर झाले दुस-याच दिवशी शासनाचे प्रतिनिधी विजय चव्हाण सह मी फुलवळ येथे शेतात पावसाने झालेली नुकसान पाहणी करुन  पंचनामे करावे अंशी विनंती केली. यंदा पण तसीच परिस्थिती आहे मा. जिल्हाधिकारी साहेबांनी  हा मतदार संघ ओला दुष्काळ जाहीर करावे अशी विनंती केली.

कोरोनां महामारी च्या काळात मतदार संघातील जनतेला संपर्कात राहात समस्या सोडवल्या मतदार संघात शानिटायझर व दवाखान्यात डाॅ किट वाटपाचा कार्यक्रम केला आहे असे बोलताना म्हणाले, उदघाटन प्रसंगी बोलताना.डॉ. विपीनजी इटनकर म्हणाले शेतक-यानी घरची शेती वाटणीचे भांडण घरीच बसून मीटवा. तुमच्या भांडनात आमचा वेळ वाया घालू नका, आम्ही तुमच्या कामासाठी शासनाचे योजना मंजूर करुन द्यायला बसलोत. नविन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला जोडून पशुपालन व्यवसाय सुरवात केली तर जगू शकता, निसर्ग सात देतं नाही. शासन नुकसान भरपाई पाच सहा हजार रुपये कधि देइल हे वाट बघत न रहाता या जोड धंदा सुरू करा शासनाचे येणार नुकसान द्यायला आम्ही आहोत,

गटशेती योजनेत आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत असें म्हणले. श्रीमती वर्षा ठाकुर मुख्य कार्यकारी अधिकारी बोलताना महिला सादरीकरण भर देत म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या शासनाच्या योजनेचा लाभ तळा गळा पर्यंत पोहोचतील असे माझे काम राहिल असे म्हणल्या या वेळी अध्यक्षीय समारोप बोलताना आ शामसुंदर शिंदे म्हणाले की मी येथे कुणावर टिका टिपणी करनार नाही. पण गेल्या विस वर्षापासून बंद असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निर्जिवला कसे सर्जिव करता येईल प्रयत्न करुन शासनाचे हमी भाव खरेदी केंद्र चालु करुन शेतक-याची व्यापा-या कडून होणारी पिळवणूक थांबावन्यासाठी नाफेडच्या माध्यमातून हे खरेदी केंद्र चालु केले आहे.

हमी भावा पेक्षा जास्त भाव मिळाला तर कुठेही माल विका पण कमी भाव घेत असतील तर तुम्ही तुमचा माल येथे आणा आनुन द्या. शेतक-यांना सक्षम करण्याचे काम मी प्रयत्न करणार आहे. कापून खरेदी जिनिगं प्रेषिगं एक वर्षात उभे करण्याचं काम करण्यासाठी तयार आहे जिल्हाधिकारी आपल्याला चांगले काम करणारे मिळाले आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकुर ह्यांचे पण काम चांगले आहे. त्यांनीदेखील एक कठिण वेळी खुप सहकार्य केले मला आठवन आहे त्यानां आठवण आहे का नाही पण मी ठिकाण सागतो मामा आजारी होते तेव्हा मी गावाडे गाडिने येतं असताना उसीर झाला वाटेत थांबव म्हणून कुरुडवाडीच्या रेस्टहाउसला एका आयपियस अधिकारी मित्रांना कल्पना दिली होती.

तेव्हा तिथे वर्षा ठाकुरनी खुप सहकार्य केले मी गावाकडे थांबलो जातांना गाडीचा ऑक्सिजट झाला ड्रायव्हर जागीच ठार झाला होता ति घटणा पण त्याच एरीयात झाली होती तेव्हा त्यानी खुप सहकार्य केले आहे हि आठवण करून कामाला उजाळा दिला, या वर्षी पावसाने पैल मुग उडीद गेला आता तोंडाला आलेल पिक सोयाबीन ज्वारी कापुस गेलें आहे. कंधार लोहा मतदार संघात शेतकरी हवालदिन झालेला आहे ओला दुष्काळ जाहीर कर्ता येईल शेतकरी जगला पाहिजे असे काम तुम्ही करा अशी विनंती मा जिल्हाधिकारी साहेबांना केली, तसेतर आपल्या जिल्ह्यातील शेतक-याचे भाग्य म्हणा.

दोघेही डाॅक्टर आहेत व्यवसाय करुन ते पैसे कमवले असते पण या कामात जनतेच्या समशा सोडवण्यासाठी हे जिल्हाधिकारी म्हणून काम करतात, पन्ती डिलेवरी हे शासकीय दवाखान्यात केले. जनतेचे काम करत असताना त्याना कोरोनां झाला तेव्हा त्यानी शासकीय दवाखान्यात स्वता उपचार घेतला. मला कोरोनां नंतर झाला कोरोनां हा दुश्मनाला सुद्धा होऊनये त्याचा त्रास कसा अस्तो आम्हाला अनुभव आहे म्हणून साहेबांनी तुम्हाला कोरोनां होउ नये लक्षात घ्यायला हवे म्हणून नियम सांगितले आहेत,

शिंदे साहेब जिल्हाधिका-यानां म्हणाले की ओला दुष्काळ जाहीर होईल असा शासनाला अहवाल द्या तिकडंच काम करणं माझी जबाबदारी आहे. असे म्हणले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाषाण ज्ञानेश्वर चोंडे सभापती यांणी केले आभार अरुण कदम उपसभापती याणी केले सूत्रसंचालन योगेश पाटील नंदनवनकर यांणी केले या वेळी मार्केट कमीटत सोयाबीन आनलेल्या पहिल्या शेतक-याचां शाल पुष्प गुच्छ मा जिल्हाधिकारी साहेब व आमदार शामसुंदर शिंदे यांनी सत्कार केला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *