लोहा दि.
लोहा शहरात कोरोना’च्या महामारीत संसर्ग झपाट्याने झाला होता. शिवसेनेचे नेते रामभाऊ चन्नावार, ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त सहकार अधिकारी आप्पाराव चव्हाण, इंजिनीअर आनंद पवार, पालिकेतील कर निरीक्षक किसन दांगटे, गटनेता करीम शेख यांच्या भगिनी ताराबेगम शेख यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने जि.प. सदस्या सौ. प्रणीताताई देवरे-चिखलीकर यांनी सर्व कुटुंबियांचे सांत्वन केले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामभाऊ चन्नावार, सेवानिवृत्त सहकार अधिकारी आप्पाराव चव्हाण यांचे ह्र्दयविकाराने निधन झाले. तरुण अभियंता अनंत संजयराव पवार, पालिकेतील कर निरीक्षक किसन दांगटे यांचे कोरोना काळात निधन झाले. तर गटनेता करीम शेख यांच्या भगिनी ताराबेगम शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले या सर्व कुटुंबियांच्या घरी सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी सांत्वन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक करीम शेख, नगरसेवक दत्ता वाले, नगरसेवक भास्कर पवार, नगरसेवक संभाजी चव्हाण, नगरसेवक बालाजी शेळके, डॉ. मंगेश क्षीरसागर, प्रभाकर कदम, नामदेव पाटील, विजय कदम बाळू पाटील यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.