खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 19 रोजी लोहा शहरातील 5 कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन

लोहा ; प्रतिनिधी


शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या विकास निधीतील विकास कामाचे भूमिपूजन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते आज दि. १९ रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला आपल्या लातूर लोकसभेचे खासदार सुधाकर श्रूगारे व या भागाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तेंव्हा या विकास कामाच्या भूमीजनास शहरातील जनतेनी उवस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी मुख्याधिकारी अशोक मोकले यांनी केले आहे.


लोहा शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नगराध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील असतात शहराच्या विकासाकडे नांदेड जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विशेष लक्ष असते खा चिखलीकर आणि नगराध्यक्ष यांच्या प्रयत्नामुळे शहरातील विकास कामे झपाट्याने होत असल्याचे दिसून येते .

शहरातील विविध विकास कामासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमाला लातूर लोकसभेचे खा. सुधाकर श्रुंगारे , लोहा विधानसभेचे आमदार शामसुंदर शिंदे, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जी .प सदस्या प्रणिताताई देवरे -चिखलीकर ,
जी. प .सदस्य चंद्रसेन पाटील गौडगावकर ,पं. स चे सभापती आनंदराव पाटील शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद पवार, भाजपचे प्रदेश अनु जाती प्रदेश सचिव छत्रपती धुतमल, भाजपाचे प्रदेशा कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम ,माजी नगराध्यक्ष किरण वटमवार ,माजी उपनगराध्यक्ष राम सूर्यवंशी ,

भाजपाचे नेते न. पा.गटनेते करीम शेख आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी सोशल डिटेक्शन पळून उपस्थित राहावे असे आवाहन लोहा न. पा. च्या वतीने नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, प्रभारी मुख्याधिकारी अशोक मोकले , यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *