कुरुळा येथील बीएसएफ जवान गणेश चव्हाण यांचा मृत्यू

कुरुळा: विठ्ठल चिवडे

कुरुळा येथील बी एस एफ जवान गणेश पिराजी चव्हाण वय (वर्ष ४२) मेघालय येथे कर्तव्यावर असताना आज दि.१८ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच कुरुळा गावासह परिसरावर शोककळा पसरली.त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

मूळ गाव पोमा तांडा परंतु जन्मतः कुरुळा गावात वास्तव्यास राहणारे चव्हाण कुटुंबीय.वडील पिराजी चव्हाण यांचे गणेश हे चौथे अपत्य होते.गणेश हे मेघालय येथील तुरी येथे कर्तव्यावर असताना आज १८ रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.बक्कल क्र.००००३६६१६,१७ बटालियन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ई. स.२००० मध्ये सामील झाले होते. दि.१८ रोजी कुरुळा गावात दुपारच्या सुमारास त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच कुरुळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचे पार्थिव उद्या कुरुळा गावात येणार असून त्यांच्या पार्थिवावर कुरुळा गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.गणेश चव्हाण यांच्या पश्चात त्यांचे वडील,तीन भाऊ ,दोन बहिणी ,पत्नी एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *