स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याला “रजोनिवृत्ती”म्हणतात.”रजोनिवृत्ति”ला इंग्रजीमध्ये “मोनोपाॅज”म्हणतात याचा अर्थ म्हणजे”जीवनात परिवर्तन”होणे होय.दरवर्षी १८ आॅक्टोंबर हा दिवस “जागतिक रजोनिवृत्ती दिवस”म्हणून साजरा केला जातो.रज:स्त्रावामूळे स्त्रीचे शरीर शुध्द व प्रसन्न राहाते.तीचे सौंदर्य अधिक खुलते.आवाजात गोडवा राहातो.जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकते.
“रजोनिवृत्ती”च्या काळात स्त्रीयांना घाबरल्यासारखे वाटते.पचनशक्ती कमी होते.स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो.वजन वाढते,रात्री झोप न येणे,घाबरल्यासारखे वाटते,मानसिक ताण जाणवतो.वाढत्या वयानूसार शरीरात अनेक बदल होतात.त्यावेळी स्त्रीयांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे तसेच रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या ,मोड आलेली कडधान्य,फळे याचा समावेश करावा.वयोपरत्पे येणा-या रजोनिवृत्तिला आणि त्यातील परिणामांना सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी ठेवावी.वयाच्या पस्तीशी नंतर प्रत्येक स्त्रीने स्वताच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यक्ता आहे.
खरे तर”रजोनिवृत्ति” कुणालाही टाळता येत नाही.पण…या प्रक्रीयेला सकारात्मक दृष्ट्या सामोरे जा.कारण ही एक शारीरीक प्रक्रीया आहे जीवननिवृत्ती नाही.ह्या सगळ्या गोष्टीवरुन एक गोष्ट लक्षात येते की मेनोपाॅज हा आजार नसून स्त्रीशरीराची अटळ आणि पूर्णत: नैसर्गिक अवस्था आहे,मासिकपाळी थांबतांना स्त्रीयांच्या मनात काही गैरसमजूती आहेत.जसे काही जणींना वाटत आपली पाळी बंद झाली की आपले स्त्रीत्व आटोक्यात येईल.खर तर “मेनोपाॅज”हा स्त्रीयांनी समजून घ्यायला हवी.या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही.”रजोनिवृत्ती”चा काळ स्त्रीजीवनात परिवर्तनाचा काळ आहे.तो खंबीरपणे स्विकारण्याचा प्रयत्न करावा.कारण,या दरम्यान तिच्यातील बदल पुरुषाने समजून घेऊन तिला भावनीक आधार दयावा.तरच ती रजोनिवृत्तीला सहजपणे समोर जाऊ शकेल.
प्रजननक्षमतेची संलग्न असलेली मासीकपाळी या विषयावर जाणीवपूर्वक बोलणे टाळले जाते.त्यामूळे स्त्रियांच्या मनातील कैक प्रश्न अनुत्तरीत राहातात.”रजोनिवृत्ती”वर तर कुणीच बोलत नाही.त्यामूळे तिच्या कोमल भावनांना आतल्या आत दडपल्या जातात,या दिवसाच्या निम्मिताने तिला समजून घेत आधार देण्याचा प्रयत्न करा.तीच्या या नव्या वळणावर साथ देऊन नव्या आयूष्याची सुरुवात करण्यास प्रोत्साहान द्या.”जागतिक रजोनिवृत्ती”च्या समस्त स्त्रीवर्गाला हार्दिक शुभेच्छा…!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१