मानसपुरीच्या सरपंच पदी स्मिता संभाजी मानसपुरे यांची बिनविरोध निवड

कंधार ; दिगांबर वाघमारे

ग्रामपंचायत मानसपुरी येथे दि.१९ रोजी बालाप्रसाद मानसपुरे व शंकर अण्णा चिवळे यांच्या नेतृत्वाखाली स्मिता संभाजी मानसपुरे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली.

निवडणूक अधिकारी म्हणून कंधार तहसील चे तहसीलदार विजय चव्हाण , उपसरपंच किरण कोकाटे आनंदराव किडे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पाटील ,मंडळ अधिकारी तलाठी जयवंत गोरे ,गोविंद मानसपुरे, सुनील जोंधळे ,दलित जोंधळे ,सिद्धार्थ जोंधळे, ग्रामपंचायत येथील सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *