शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ राजमुद्रा ग्रुप च्यावतीने कंधार तहसीलवर रुमणे मोर्चा धडकला

कंधार-


     अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे  नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी  यासाठी राजमुद्रा सामाजीक संघटना मैदानात उतरली असुन दि.१९  अॉक्टोबर रोजी कंधार  तहसिल कार्यालयावर प्रचंड असा रुमणे मोर्चा धडकला व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.


        दिनांक १९ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या रुमणे मोर्चा  राजमुद्रा ग्रुप सामाजिक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिन पाटील इंगोले व जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे यांच्या नेतृत्वात शहरातील माईचे मंदिर येथून निघाला मुख्यरस्ताने तहसिलवर धडकला .
यावेळी निवेदन देण्यात आले.या निवेदनात असे नमूद केले की दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,यावर्षीचा सरसकट पिक विमा मंजुर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,शेतकऱ्यांना एमआरइजीएस अंतर्गत त्यांच्याच शेतात मजुरी द्या, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करा, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा मराठा, 


आरक्षण शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करावे, शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, तालुक्यातील रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे तरी ते तत्काळ दुरुस्त करा अशा एकूण बारा प्रमुख मागण्यांसाठी राजमुद्रा ग्रुप सामाजिक संघटनेच्यावतीने आज कंधार तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाला शिवप्रसाद तेलंग, पंकज गायकवाड, बळीराम पवार,सचिन चव्हाण, शिवराज पवार, प्रा. पी.एम व्यवहारे,पिंटू ये वाढ बालाजी इंगोले, आरिफ शेख बेटमोगरेकर, पार्वती ताई केंद्रे, बंटी गायकवाड, यांच्यासह आदींची उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *