‘मातीत रुजले बियाणे असे की आले हिरवे जगणे भेटीला’ सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा रंगली ; वर्षावास पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदनेचा कार्यक्रम

‘मातीत रुजले बियाणे असे की आले हिरवे जगणे भेटीला’
सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा रंगली ; वर्षावास पौर्णिमेनिमित्त बुद्ध वंदनेचा कार्यक्रम


नांदेड –

तेवणारा दिवा वादळवाऱ्यातही होता साथीला, मातीत रुजले बियाणे असे की आले हिरवे जगणे भेटीला हा आशय आणि विषय घेऊन मानवी सौहार्दाची मांडणी करणारा कविसंमेलनाचा आॅनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. सप्तरंगी साहित्य मंडळाकडून आयोजित काव्यपौर्णिमा या मालेतील एकतिसावी काव्यपौर्णिमा ऑनलाईन श्रोत्यांच्या सहभागाने रंगली. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार येथील ज्येष्ठ कवी डॉ. दिलीप लोखंडे हे होते तर उद्घाटक साहित्यिक मारोती कदम, अतिथी कवी म्हणून किनवट येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक कवी रमेश मुन्नेश्वर, लेखिका रुपाली वैद्य/वागरे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती. यावेळी सहभागी कवींनी भारतीय स्वातंत्र्य लढा, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, वर्षावास पौर्णिमा, कोरोनाकाळ आदी विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण केले.
               येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरपौर्णिमेला काव्यपौर्णिमा या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला बौद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे. अंगुलीमालाची धम्मदीक्षा, अनाथपिंडकाचे सूक्तपठण आणि पहिली जागतिक धम्म परिषद या घटना श्रावण महिन्यातील पौर्णिमेला घडलेल्या आहेत. त्याचे औचित्य साधून सप्तरंगी साहित्य मंडळाने पालीनगर येथील संबोधी बुद्ध विहारात बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेतला. तत्पुर्वी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूष्पपूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, अंकुश खंदारे, सचिन गायकवाड, मानव लांडगे, मनोहर लांडगे यांची उपस्थिती होती. यानंतर सायंकाळी चार वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवींच्या कविसंमेलनाचा झूम अॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला. 

               रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, श्रावण महिना, वर्षावास पौर्णिमा, नारळी पौर्णिमा हे विषय कवींसाठी निश्चित करण्यात आले होते. तसेच कोणतीही कविता निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार काव्यपौर्णिमा कार्यक्रमात शरदचंद्र हयातनगरकर, अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, अनिसा शेख, डॉ. दिलीप लोखंडे, बाबुराव पाईकराव, गंगाधर ढवळे, मारोती कदम, रुपाली वैद्य वागरे, रमेश मुनेश्वर, आनंद चिंचोले आदींनी सहभाग नोंदवला. कविसंमेलनाच्या दुसरी फेरीही मोठ्या प्रतिसादात आणि उत्साहात रंगली. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र अनुरत्न वाघमारे यांनी हाती घेतले तर आभार ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर गच्चे, कैलास धुतराज, प्रशांत गवळे, बाबुराव थोरात, नागोराव जोगदंड, अशोक ढवळे, भीमराव ढगारे, उद्वव झडते, नागोराव जोंधळे, शंकर धोंगडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *