ये अल्लाह हमारे आमदार माधवराव पटेल साहब के बिमारी मे दवाओं का असर और तबियेत मे सुधार फर्मा..!माजी नगराध्यक्ष अ. अखिल यांनी बकरी ईदच्या नमाज वेळी केली दुआ

ये अल्लाह हमारे आमदार माधवराव पटेल साहब के बिमारी मे दवाओं का असर और तबियेत मे सुधार फर्मा..!
माजी नगराध्यक्ष अ. अखिल यांनी बकरी ईदच्या नमाज वेळी केली दुआ

हिमायतनगर – (गोविंद गोडसेलवार)


हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटिल जवळगावकर प्रकृती स्वास्थ्यामुळे मुंबईत उपचार घेत आहेत, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी बकरी ईद दिनी नमाज अदा करतांना माजी नगराध्यक्ष अ. अखिल यांनी ” ये अल्लाह हमारे आमदार माधवराव पटेल साहब के बिमारी मे दवाओं का असर और तबियेत मे सुधार फर्मा” अशी आर्त दुआ अल्लाह कडे मागितली, एकुणच सकाळी निर्मळ अंतकरणाने अल्लाह कडे केलेली अर्जी मान्य होत असते.

हिमायतनगर तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला नव्हता परंतु आता रूग्ण मिळत आहेत, तालुक्यातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह होते, मात्र त्यांच्या संपर्कातील व्यक्ती क्वॉरंटाईन नंतर ही ठनठनीत आहेत.
हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांना संपर्कातुन कोरोनाची बाधा झाल्याने नांदेड नंतर मुंबईला भर्ती करण्यात आल आहे, तिथे त्यांचेवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या दवा बरोबर हितचिंतक, समर्थकांची दुआ त्यांच्या कामी पडत आहे.

जवळगावकरांचे कुण्या एका जाती धर्माच्या व्यक्ती बरोबर संबंध आहेत अस नाही सर्व जाती पंथांच्या लोकांना ते मदत सहकार्य करत असतात, त्यामुळे त्यांचेवर समाज माध्यमातुन कळवळलेल्या भावनिक पोष्ट येत आहेत.

मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण आहे, अनेक चाहते जवळगावकरांना आपलस मानतात आपल्या खास व्यक्तीसाठी काहितरी करण्याचा मानस ते ठेवतात, माजी नगराध्यक्ष अ. अखिल यांनी सकाळीच बकरी ईदची ‘नमाज ए बकरी ईद’ अदा केली, या वेळी  दुआ करतांना ” ये अल्लाह हमारे आमदार माधवराव पटेल साहब के बिमारी मे दवाओं का असर और तबियेत मे सुधार फर्मा ” बुरी नजर से उनको दुर रख, अशी आर्त आळवणी अल्लाहकडे केली आहे, मुंबईत डॉक्टरांची दवा चाहत्यांची दुआ जवळगावकरांसाठी फलदायी ठरणार यात तिळमात्र शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *