जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी – प.स. सभापती सुरेखा आडे यांच आवाहन
हिमायतनगर – (गोविंद गोडसेलवार)
कोरोना आपल्या पर्यंत येण्या आधी जनतेने आरोग्याची काळजी घेवुन कोरोना आजार टाळण्याच्या प्रतिबंधात्मक उपायांचा स्विकार करावा, कुठल्याही अफवा, व्हायरल संदेशावर विश्वास ठेवु नये, प्रशासनातील अधिकारी, आरोग्य विभाग सज्ज आहे, प्रत्येक व्यक्तीने स्वत: सोबत कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आडे यांनी केल आहे.
कोरोना संक्रमण काळातील पहिल्या दुसर्या लॉक डाऊन दरम्यान हिमायतनगर तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही, हे येथिल प्रशासनाने घेतलेली मेहनत, जनतेनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याच फलित आहे, तालुक्यात भुमिअभिलेख कार्यालयातील बाधित कर्मचार्या नंतर पाच रूग्ण आढळले परंतु त्यांच्या संपर्कातील कुणिही पॉझिटिव्ह आला नाही, हि जमेची बाजु आहे.
आमदार माधवराव पाटिल जवळगावकर साहेब, जनतेच्या संपर्कात राहुन, कामा निमित्त बैठकांना वर्णी लावत असतांना संपर्कातुन त्यांना लक्षणे जानवु लागल्याने त्यांचेवर कोरोना इतर आजारांमुळे मुंबईत उपचार सुरू आहेत, सर्व गोर गरीब जनतेचे सेवक जवळगावकर साहेब दवाखाण्यात आहेत. विषाणुला गरीब श्रीमंत, जात धर्म, लिंग भेद अस काही नाही, तो कोणाला आपला म्हणुन संपर्कात आलेल्यांना सोडत नाही, सर्व साधारण आजार होत असतात, परंतु जनतेनी विषाणुजन्य आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने घालुन दिलेल्या नियमांच कटाक्षान पालन कराव, कोरोनाला हरवण्यासाठी सुरक्षा साधनांचा वापर करावा स्वत:ची परीवाराची काळजी घ्यावी. असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सुरेखा आडे यांनी केल आहे त्या नांदेड 24 न्युजशी संवाद साधतांना बोलत होत्या.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या हिमायतनगर येथिल बाधित महिला आजारातुन बरी झाली, भुमिअभिलेख मधिल दोघांची सुट्टी झाली, बळीराम तांडा येथिल बाधित व्यक्ती ग्रामिण रूग्णालय धर्माबाद येथे नौकरीला आहे, त्यांचे संपर्कातील सर्व अहवाल निगेटिव्ह आलेत. आमदार माधवराव पाटिल जवळगावकर साहेब जनतेच्या संपर्कात राहुन बाधित झाले, त्यांच्यावर पुर्वी ह्रदयाशी संबंधित शस्त्रक्रिया झाल्याने खबरदारी म्हणुन मुंबईत उपचार सुरू असुन दवाखाण्यातील बेड वरून ते मायबाप जनतेला तब्येतीची काळजी घेण्याच सतत व्हिडिओच्या माध्यमातुन सांगत आहेत, उपरोक्त प्रत्येकाला, सेवा देतांना कुणाच्या तरी संपर्कातुन आजार आलेला आहे, हा आजार संसर्गजन्य किचकट गुंतागुंतीचा असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी सुरक्षा साधने वापरून कोरोनाला टाळाव, अस त्यांनी जनहिताच्या निरोगी स्वास्थ्यासाठी आवाहन केल आहे.
यावेळी कैलास माने, दगडु खरोडे, दत्ता पवार, सरपंच नामदेव आडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बापुराव आडे, बळीराम राठोड, धनु राठोड, अर्जुन राठोड, यांची उपस्थिती होती.Attachments area