व्यक्तीवेध -प्रा.सुभाष वाघमारे….. प्रयत्नवादी मंचावरून यशाला खेचून आणणारं व्यक्तिमत्व:सुभाषअण्णा

व्यक्तीवेध -प्रा.सुभाष वाघमारे( पत्रकार)


प्रयत्नवादी मंचावरून यशाला खेचून आणणारं व्यक्तिमत्व:सुभाषअण्णा 

आज ४ ऑगस्ट म्हणजे १९१४ साली सुरू झालेले पहिले महायुद्ध या युध्दात जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली तशी जन्मत:च विविध संकटांनी चढाईयुक्त जिवन लाभलेल्या प्रा.सुभाष विठ्ठलराव वाघमारे यांचा जन्म ४ ऑगस्ट १९७६ रोजी कंधार तालुक्यातील उमरज या गावी प्रयागबाईच्या पोटी झाला.आईवडील हे अतिशय गरीबीतुन जगत असतांना दोन मुली व एक मुलगा या तिघांचे पालन अतिशय आनंदाने करायचे.मुलाला शिकवुण फार मोठं करायचा अट्टाहास व ध्यास घेतलेल्या आईवडीलांनी सुभाषला शिकवलं एम.ए.(मराठी, राज्यशास्त्र),बी.पी.एड्.,बी.एड्.,एम.एड्.शिक्षकीपेशासाठी काळही चांगलं होता व नौकरीही समाधानाची म्हणजे मी चांगले विद्यार्थी घडविणार अशी होती.   परिस्थितीने गांजुन जावून मनावर ओझे घेवून कोणालाही ते न दाखविता दमत-भागत सर्व जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतापाडता मुलगी दहावी पास झाली.पगार चालू होणार कि नाही याचिंतेने रात्र उघड्याडोळ्यांनी सुर्याबरोबर भरती व्हायची.पण हार मानली नाही,प्रयत्न सोडले नाहीत.म्हणतात ना ”भगवान के देर है;अंधेर नहीं”अगदी तसंच झाल.अन् सोन्याचा दिवस पाहावयास मिळाला.मनात आनंद मावेना पण व्यक्त कुठे करावे ? सांगावे तरी कुणाला?सांगण्यात असा काय मोठेपणा? अशी मनातच कल्पना करून मिळालेल्या अविस्मरणीय आनंदालाही या माणसाने उरातच दाबून ठेवले.म्हणुनच आजचा दिवस हा आयुष्यातील कधीही न पाहिलेला आहे.

भागवत गोरे ,कंधार मो.7507599753

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *