कंधार ;
कुरूळा येथील शहीद जवान गणेश चव्हाण यांच्या घरी दि.२२ रोजी येऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व सर्व सहकारी उपस्थित होते.
कुरुळा येथील बी एस एफ जवान गणेश पिराजी चव्हाण वय (वर्ष ४२) यांचे मेघालय येथे कर्तव्यावर असताना दि.१८ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला होता.यांच्या पार्थिवावर कुरुळा येथे दि.२० रोजी अंत्यसंस्कार करण्यात आला होता.
दि.२२ रोजी लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
यांनी शहीद जवान गणेश चव्हाण घरी भेट देवून यांच्या मुलाचा नवोदय विद्यालयात प्रवेश व निवासाची व्यवस्था तसेच समस्त चव्हाण कुटुंबीयांना जे जे काही सहकार्य करता येईल त्यासाठी मी आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून सदैव तत्पर आहे असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी व्यक्त करुन कुटुंबीयांना धीर दिला..