नांदेड ; दिगांबर वाघमारे
अखिल भारतीय मराठा महासग्रांम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंड .राजकुमार सुर्यवंशी पाटील यांचा अध्यक्षतेखाली लातुर येथील संपर्क कार्यालयात बैठाक घेण्यात आली .नांदेड जिल्हायात पुन्हा जोमाने अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी सुनिल पाटील हराळे तर जिल्हाध्यक्षपदी संभाजी मोरे यांची निवड जिल्हयाचे धडाकेबाज कार्यक्रर्ते श्री सुनील हराळे पाटील यांची मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नांदेड जिल्हाध्यक्ष पदी संभाजी मोरे यांची तर जिल्हा कार्यअध्यक्ष पदी दता खानापुरे यांची निवड करण्यात आली . कंधार तालुका अध्यक्ष पदी राघोबा पाटील कदम यांची निवड यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. राजकुमार सुर्यवंशी पाटील यांनी केली आहे.
उर्वरित कार्यकरणी आठ दिवसात मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हयासह मराठवाडा अध्यक्ष पदाची निवड करून पुन्हा त्याच जोमाने संघटना वाढणार आहे मराठ महासंग्राम संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संमंधीत नसलेली एक ज्वलंत क्रांतीकारी चळवळ म्हणुन उभ्या महाराष्ट्रमध्ये जोमाने वाढत असुन अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम संघटना करीत आहे. संघटनेचे ध्येय धोरण व विचार नांदेड जिल्हयात घरोवरी पोहचवीण्यासाठी काम नवीन पदधिकाय्रांनी करावे असे आव्हान ही संस्थापक अध्यक्ष ॲड.राजकुमार सुर्यवंशी पाटील यांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिण्यात आल्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुनिल पाटील हराळे यांनी सर्व प्रथम संस्थापक अध्यक्ष ॲड.राजकुमार सुर्यवंशी पाटील यांनी अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करुन दाखवलेला विश्वास मी सार्थ करणार असून संघटनेची ताकत वाढवण्यासाठी मराठवाड्यात दौरा करुन तरुणांची फौज निर्माण करणार असल्याची माहीती यावेळी दिली.तसेच सःघटनेचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी कटीबद्द असल्याचे यावेळी सुनिल पाटील हराळे यांनी सांगितले .