गुळ कारखाना सभासद नोंदणी कार्यक्रमाचा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते बारूळ येथे शुभारंभ

कंधार ;दिगांबर वाघमारे

आशा फार्म प्रोड्युसर कंपनी हळदा ता. कंधार अंतर्गत गुळ कारखाना सभासद नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते बारूळ येथे दि.२२ रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला .

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे म्हणाले की आगामी काळात लोहा, कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व विकासासाठी भरीव प्रयत्न करण्यात येणार असून लोहा, कंधार तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सभासद नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आशाताई शिंदे यांनी उपस्थितांना बोलताना केले.

लोहा कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात जे पिकवले ते विकले पाहिजे हे सूत्र शेतकऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी आशा फार्मस कंपनीची स्थापना करण्यात आल्याचेही सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे यांनी यावेळी सांगितले, या कंपनीमध्ये सभासद नोंदणी फीस अल्प असून एका सभासदांसाठी जास्तीत जास्त दोन एकर पर्यंत ऊस लागवडीची मर्यादा असेल ,उसाचे रोप व खताचे व्यवस्थापन करण्यासाठी आशा फार्मस कंपनी सभासद झालेल्या शेतकऱ्यांना 31 हजार 500 रुपयांचे पॅकेज देणार असल्याचेही यावेळी आशाताई शिंदे यांनी उपस्थितांना बोलताना सांगितले .या कार्यक्रमास डॉ. मोहन कल्याणकर यांचे ऊस लागवड, हळद ,सोयाबीन ,कापूस या पिकाची लागवड व जोपासना याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .

कार्यक्रमास गंगाधर वाकुर्डे, पं. स . सदस्य दिगंबर पाटील वडज, बाबुराव पाटील शिंदे ,उपसभापती अरुण पाटील कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी पानपट्टे ,माधव पाटील घोरबांड ,योगेश पाटील नंदनवन कर, नारायण सावकार, व्यंकट पाटील जाधव ,बंटी गादेकर, बालाजी ईसातकर सह परिसरातील शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी ,नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते ,या कार्यक्रमाचे आयोजन बारूळ येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर सिंह ठाकूर यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *