कुरुळा; विठ्ठल चिवडे
कुरुळा येथील प्रल्हाद देवराव चिवडे वय वर्ष ५० यांचे कुरुळा येथील राहत्या घरी ता.२० रोजी आकस्मित मृत्यू झाला.त्यांच्या पार्थिवावर बुधवारी नांदेड पोलीस दलाच्या वतीने शोकाकुल वातावरणात हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली.
प्रल्हाद चिवडे हे नांदेड परिक्षेत्रातील पोलीस हेड क्वार्टर येथे हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.ते १६ जून १९९२मध्ये पोलीस दलात सामील झाले होते.मृत्यूसमयापूर्वी त्यांनी २८ वर्ष सेवा बजावली.त्यांचा बक्कल क्र.१८७५ असून त्यांनी नांदेड,तामसा, लोहा, नांदेड या ठिकाणी कर्तव्य बजावलेल आहे.ता.२० रोजी मंगळवारी सायंकाळी ७:३० वा.आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी गावभर पसरली.दुसऱ्या दिवशी ता. २१ रोजी त्यांच्या पार्थिवावर स्वमालकीच्या शेतीत पोलीस दलातील नऊ तुकडीच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली.तत्पूर्वी पोलीस अधीक्षक नांदेड प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक मनीषा पवार,बिट जमादार सुभाष चोपडे,सरपंच उमाकांत चिवडे,मा.सभापती कालिदास गंगावारे, हरिहर पाटील यांचेसह उपस्थितांनी पुष्पचक्रानी श्रद्धांजली अर्पण केली.सेवा उर्वरित असताना प्रल्हाद यांच्या अचानक जाण्याने दुःख व्यक्त केले जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सून,आई वडील,भाऊ,बहिणी असा परिवार आहे.