कुरुळा ;विठ्ठल चिवडे
माझ्या मतदारसंघातील देशसेवा बजावणाऱ्या गणेश चव्हाण या उमद्या तरुणाचा मृत्यू झाला ही संबंध जिल्ह्यासाठी वाईट घटना आहे.मी चव्हाण कुटुंबीयांच्या दुःखात सामील असून आशा संकटसमयी धीर देण्यासाठी मी चव्हाण कुटुंबियांची भेट घेतली.मी सुख दुःखात नेहमीच कुरुळवासीयांच्या पाठीशी असल्याचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
ते कुरुळा येथील सीमा सुरक्षा दलातील जवान गणेश पिराजी चव्हाण,पोलीस हेड क्वांस्टेबल प्रल्हाद देवराव चिवडे,किराणा दुकानदार चांद कासार यांच्या मृत्यूपश्चात सांत्वन भेट देण्यासाठी कुरुळा येथे आले होते.यावेळी त्यांच्या समवेत कंधार तालुका प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण, भाजपा बंजारा समाज प्रमुख देविदास भाऊ राठोड,भाजपा किसान मोर्चा चे बाबुराव केंद्रे,जफ्रोद्दीन बाओदिन,जि.प.सदस्य प्रतिनिधी बाळासाहेब गोमारे,मा.सभापती कालिदास गंगावारे,आत्माराम धुळगंडे, भगवान राठोड,प्रा.किशन डफडे,सुंदरसिंग राठोड,ग्रामसेवक विलास कल्हाळे,तलाठी अन्सारी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा.चिखलीकर म्हणाले की,कुरुळा ही माझी कर्मभूमी आहे.या दुःखद प्रसंगी या कुटुंबीयांचा घटक म्हणून स्थैर्य आणि धैर्य देण्यासाठी मी आलेलो आहे.याप्रसंगी खा.चिखलीकर यांनी मृत्यू पावलेल्या गणेश चव्हाण,प्रल्हाद चिवडे,चांद कासार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत सर्वतोपरी शक्य असणारी मदत करण्याची ग्वाही दिली.यासमयी गावातील यादवराव चिवडे,बालाजी पोवळे,बबन नाईक,फारूक कासार आदींची उपस्थिती होती.
यापूर्वी गणेश चव्हाण यांच्या मृत्यूपश्चात हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील, नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनीही कुटुंबाची विचारपूस करत सांत्वन केले आहे.