लोहा / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी च्या लोहा तालुकाध्यक्षपदी सरपंच अर्जुन राठोड यांची निवड करण्यात आली.
भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते तथा खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे खंदे समर्थक असलेले देवला तांडाचे कर्तव्यदक्ष सरपंच अर्जुन राठोड यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक असो सक्रिय सहभाग घेऊन भारतीय जनता पार्टीचे उल्लेखनीय कार्य खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या लोकाभिमुक विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोहचविणे नाही त्याचा प्रचार-प्रसार करणे आदी कार्य केले . त्यांच्या या कार्याची दखल भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व पक्षाने घेऊन त्याला अत्यंत महत्त्वाच्या भाजपाच्या ओबीसी आघाडीच्या लोहा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली व भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सरपंच अर्जुन राठोड यांची भाजपा ओबीसी आघाडी लोहा तालुका अध्यक्षपदी निवड केली.यावेळी आ.राम पाटील रात़ोळीकर, आ. तुषारभाऊ राठोड, जिल्हाध्यक्ष व्यंटकराव पाटील गोरेगावकर, आदी उपस्थित होते.
अर्जुन राठोड यांच्या निवडीचे स्वागत भाजपा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे , भारतीय दूरसंचार समितीचे सल्लागार सदस्य साहेबराव पाटील काळे, पंचायत समिती सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड, आदीने केले.