कंधार ;
मसलगा ता.कंधार येथील गॅस ग्राहकांची प्रधानमंत्री ऊज्वला गॅस कनेक्शन देतो म्हणून फुसवणूक झाले असल्याचे निवेदन तहसिलदार विजय चव्हाण यांना निवेदन माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
खुरेशी भारत गँस एजन्सी हाडोळती, ता. अहमदपूर या एजन्सीने मसलगा येथिल सुमारे २५ ते ३० ग्राहकांची एजन्सी धारकाकडून आर्थिक लुटमार करून फसवणूक केली असल्याचे निवेदन दि.२३ रोजी देण्यात आले आहे.
फसवणूक करणाऱ्यावर फौजदारी संहिता प्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक सुधाकर अण्णा कांबळे,सतिश देवकत्ते,सुरेश कल्हाळीकर पांडुरंग पाटील मसलगेकर, विशाल पाटील मसलगेकर आदी उपस्थित होते.