गूळ कारखाना सभासद नोंदणी कार्यक्रमाला पानभोसी येथे प्रतिसाद

कंधार ; ओम ठाकुर

आशा फार्मस प्रोड्युसर कंपनी हाळदा ता.कंधार जि.नांदेड
गूळ कारखाना सभासद नोंदणी कार्यक्रमाचा पानभोसी येथे सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उत्सवात शुभारंभ झाला.

यावेळी आशाताई यांच्या हस्ते पानभोसी येथील देवीची आरती करण्यात आली.कार्यक्रमात बोलताना आशाताई म्हणाल्या की, लोहा कंधार जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून सभासद नोंदणी करून घ्यावी असे प्रतिपादन आशाताई यांनी केले त्यानंतर या कार्यक्रमासाठी श्री डॉ. मोहनराव कल्याणकर यांचे उसलागवड ,हळद,सोयाबीन,कापूस या पिकाची लागवड व जोपासना या विषयी मार्गदर्शन केले,त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यादव महाराज डांगे,बालाजीराव डांगे,माधव घोरबांड,मोहन कल्याणकर,सोसायटी चेअरमन बळी ताटे,शत्रूगंन डांगे,उद्धवराव ताटे ,गोविंदराव डांगे,धारबाजी गुंडे,गंगाधर ताटे,बळीराम ताटे,सुधाकर ताटे,किशन ताटे
तरी परिसरातील शेतकरी,ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक व मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *