कंधार
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरी ही चळवळीची नगरी म्हणुन अख्या महाराष्ट्रात सुपरिचीत आहे.महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी,विद्रोही विचारवंत,ज्येष्ठ स्वातंत्रता सेनानी,माजी खासदार व आमदार,कल्पक सत्याग्रहांचे जनक मा.डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या मातोश्री,त्यांची प्रेरणा श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधारची उर्जास्त्रोत मातोश्री मुक्ताई धोंडगे,पिताश्री शंकराराव लिंगोजी पा.धोंडगे,आजोबाश्री लिंगोजी पा.धोंडगे,श्रीमती कोंडाबाई दिगंबरराव पा.धोंडगे व दिगंबरराव लिंगोजी पा.धोंडगे यांच्या समाध्या शांतीघाटा जवळ होत्या,त्या पुर्वी दगडी चिर्यांनी बांधललेल्या होत्या.या लाॅकडाउनच्या काळात डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या लक्षात आले की,या समाधी स्थळांना ग्रेनाईट बसविण्याची इच्छा व्यक्त करताच,माजी जि.प.सदस्य व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन कंधारचे अध्यक्ष भाई डाॅ.प्रा.पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी पुढाकार घेवून त्यांच्या संकल्पनेतून अगदी कमी वेळात गावातील ग्रेनाइडचे कलावंत शिवदास कुरुंदे व त्यांच्या सहकारी यांच्या कलेतून समाध्यांचे सुशोभीकरण करण्या आले.
समाध्यावरती लोखंडी मंडप त्यावर टिनची व्यवस्था करुन समोर सीमेंटच्या स्लीपर्सचे सुंदर काम करुन पाचही समाध्यांचा जिर्णोध्दार विजयादशमीच्या आनंदी पर्वावर करण्यात आला.जिर्णोध्दाराचे काम सुरु असतांना नगरीचे सरपंच भाई माधवराव पा.पेठकर,उपसरपंच भाई गुरुनाथ पा.पेठकर,माजी उपसरपंच भाई उत्तमराव भांगे यांनी वेळोवेळी कामाची पाहणी करत.हे सुशोभिकरणाचे काम केल्या नंतर आजच्या विजयादशमी जिर्णोध्दार कार्यक्रमात समाध्यांचे पुजन व अभिषेक मातोश्री मुक्ताईच्या आवडत्या स्नुषा ग्रामिण लेखीका व मुक्ताई मुद्रनालयाच्या संचालिका सौ.चंद्रप्रभावती केशवराव धोंडगे व थोरल्या नात स्नुषा जि.प.नांदेडच्या विद्यमान सदस्या व प्राध्यापिका सौ.संध्याताई मुक्तेश्वरराव धोंडगे आणि धाकल्या नात स्नुषा छ.शंभुराजे इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे,थोरले पणतू युवराज मुक्तेश्वरराव धोंडगे,धाकले पणतू विक्रमादित्य पुरुषोत्तमराव धोंडगे व पणती कु. राजलक्ष्मी पुरुषोत्तमराव धोंडगे सर्व धोंडगे परिवांच्या लहान थोर सदस्यांच्या समर्थ हस्ते दुग्धाभिषेक व पुजन करण्यात आले. सुश्राव्य आरतीचे गायन सौ.लक्ष्मीबाई धोंडीबाराव पेठकर यांनी केले
या जिर्णोध्दाराचा कार्यक्रम दसर्यांच्या आनंदी पर्वावर मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या सहित पाच समाध्यांचा जिर्णोध्दार करतांना ज्येष्ठ स्वातंत्रता सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे माजी आमदार व मोतोश्रींची आवडती स्नूषा ग्रामिण लेखीका, डाॅ.भाई धोंडगे यांच्या आधिश्वरी सौ.चंद्रप्रभावती केशवराव धोंडगे, संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे,विद्यमान जि.प.सदस्या,प्रा. सौ.संध्याताई मुक्तेश्वरराव धोंडगे,छ.शंभुराजे इंग्लीश स्कूलच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई पुरुषोत्तम धोंडगे,माजी प्राध्यापक वैजनाथराव कुरुडे,सरपंच माधवराव पा.पेठकर,माधवराव आंबटवाड,गुरुनाथ पेठकर,उत्तम भांगे,परमेश्वर पेठकर, संजय शेकापुरे,ग्रेनाईड कलावंत शिवदास कुरुंदे,बालाजी परोडवाड,बाळू सोळंके,बळीराम कुरुडे,बळीराम पेठकर,राजु बनवसकर,शुभम कुरुडे आदीची यावेळी उपस्थिती होती.