सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव पाटील झरीकर यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावे,- मा. सरपंच प्रभाकर ठोले डेरलेकर

लोहा प्रतिनिधी

सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक माधवराव पाटील झरीकर यांना   राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्त करावे अशी मागणी माजी सरपंच प्रभाकर ठोले डेरलेकर यांनी  केली आहे . सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे स्वच्छ व निर्मल गाव चे प्रणेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असल्याने महाराष्ट्र शासनाने स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केलेले नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कार्य केले आहे .

अनेक गावे हे हागणदारीमुक्त केले आहे. अनेकांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित केले . महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छतादूत म्हणून महाराष्ट्रातील अनेक नगर पलिका ,जिल्हा परिषद ,ग्रामीण भागातील गावे यांची तपासणी केली तसेच नांदेड जिल्ह्यातील पहिले  हागणदारीमुक्त  स्वच्छ निर्मल गाव म्हणून झरी या गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळवून दिला झरीचे २० ते 25 वर्षे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळले , अनेल गोरगरीब मुलांना मुलींना शिक्षणासाठी  प्रयत्न केले आहेत  अनेक मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पैशातून मोफत पासेस काढून दिल्या. तसेच महाराष्ट्र शासनाकडे मुलीना मोफत शिक्षणासाठी पास मिळावी म्हणून मागणी केली ती मान्य झाली. गावामध्ये महिला सक्षमीकरण केले महिलांच्या नावाने घरे शेती जमीन  केल्या अनेक उद्योग धंदे उभारून दिले.  

सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आदी कार्यामध्ये सहभागी असलेले   स्वच्छ  व निर्मल गावचे प्रणेते ज्येष्ठ समाजसेवक स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर हे देशाचे माजी मंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून परिचत आहेत.  काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत .आता ते जरी समाजकारणा मध्ये असले तरी त्यांची मुले हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी एकनिष्ठ आहेत.  

राज्यात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक कलाकार आदीची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून १२  जागेची निवड केली जाते . यात मराठवाड्यातून विशेषकरून नांदेड जिल्ह्यातील सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांची काँग्रेस पक्षाने   राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्तीसाठी शिफारस करून त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी माजी सरपंच प्रभाकर ठोले डेरलेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *