लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील पोलेवाडी शिवारतुन उपविभागिय आधिकारी यांनी गोपनिय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत छापा मारुन तब्बल 1 क्विंटल 29 किलो गांजा जप्त करुन एकास आटक केली आहे.
सदरिल प्रकरणी तालुक्यातील पोलेवाडी येथील आरोपी कुलपा उर्फ बाबू पोले यांच्या शेतात पेरलेली गांजा पेरलेली गोपनिय माहिती मिळताच उपविभागिय आधिकारी किशोर कांबळे यांनी गोपनिय माहितीच्या आधारे पोलेवाडी शिवारत थेट मोठी कारवाई करत 1 क्विंटल 29 किलो गाजा जप्त केलाला असुन, त्याची किमत बाजारभावा नुसार 3 लाख 87 हजार 600 रपये असुन, या प्रकरणी आरोपी कुलपा उर्फ बाबू पोले वय (60) यास ताब्यात घेण्यात आले, या कारवाईत उपविभागिय आधिकारी किशोर कांबळे सह लोहा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये पोलिस उपनिरीक्षक राठोड, पो.हे.काँ अशोक केंद्रे,पो.हे.काँ प्रकाश केंद्रे,पो.हे.काँ,भारती,पो. काँ शेळके यांच्या पथकाने कारवाई केली. सदरिल प्रकरणी आरोपीस न्यायालया समोर उभे केले असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.