नवीन नांदेड –
आजच्या युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्यामागे धावाधाव न करता यथाशक्ती व्यवसाय करण्याबाबत विचार केला पाहिजे. व्यवसाय निर्मितीतून रोजगाराची निर्मिती होते. त्यामुळे आजच्या युवकांनी व्यवसायनिर्मितीकडे वळावे असे प्रतिपादन मनपाचे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी केले. ते भगतसिंग चौक असर्जन कार्नर धुमाळवाडी येथे शिखरे पाटील जवळेकर यांच्या शिवशंभो अटोमोबाईल्स व सर्व्हिसिंग सेंटर या नवीन व्यवसायात पदार्पण प्रसंगी बोलत होते.
यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते जीवन पाटील घोगरे, छावा क्रांतीविर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश भाऊ मोरे,लोहा पंचायत समितीचे माजी सभापती सतिश पाटील उमरेकर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी डॉ.कालीदास मोरे साहेब, सोनखेडचे सरपंच अच्युतभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती.
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अत्याधुनिक सर्व्हिसींग सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वत:चा व्यवसाय उभारुन परिसरातील बेरोजगार युवकांसमोर आदर्श निर्माण केला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी नांदेड दक्षिण भाजपा तालुकाध्यक्ष सुनील मोरे, प्रकाश दादा मोरे, श्री काळेश्वर संस्थानचे सचिव शंकरराव हंबर्डे मामा, गोविंदराव पाटील धुमाळ, पोलिस निरीक्षक विजय जाधव सर, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष पदमाकर सावंत, भाजपचे माधवराव पाटील सांवत, युवक काँग्रेसचे नितीन पाटील झरीकर, युवा क्लाथ सेंटरचे सतिश पाटील बस्वदे, विलास भाऊ मोरे, गणेश पाटील सांवत ,एपीआय केंद्रे साहेब, उत्तमराव पाटील , सरपंच मुरली पाटील, लोकहित लाईव्ह न्युज चे संपादक साहेबराव कोलंबीकर, युगसाक्षी लाईव्हचे संपादक गंगाधर ढवळे, राष्ट्रवादी ग्रंथालय काँग्रेस नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष दगडगावकर, नांदेड मनपाचे वसुली अधिकारी ज्ञानेश्वर मोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, विठ्ठल सावकार मोरे, शिवानंद मठपती, नागरगोजे, शंकरदादा म्हेत्रे यांनी अंकुश पाटील शिखरे, प्रभाकर पाटील शिखरे यांना पुढील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.