कंधार येथिल वंचित बहूजन आघाडीचे शिवालय संपर्क कार्यालय जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास खुले राहील – शिवाभाऊ नरंगले

कंधार ;

वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रेध्येय बाळासाहेब आंबेडकर यांची विचारधारा कंधार लोहा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यत नेण्यासाठी व तळागळातील नागरीकांचे प्रश्न सोडवण्याठी श्री १०८ दिगांबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या आशीर्वाद घेवून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज वंजारी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवालय कार्यालयाचा शुभारंभ झाला असून सेवेसाठी व समस्या सोडवण्यासाठी चोवीस तास उघडे राहणार असल्याची माहीती दि.२८ रोजी पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी दिली.

पुढे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले म्हणाले की शिवालय हे कार्यालय दुसऱ्या सारखे केवळ निवडणूक काळापुरते मर्यादित नाही , संपर्क कार्यालयात भेट देवून आपल्या समस्या भेट नोंद वही मध्ये समस्या नोंदणी करावे

तात्काळ अॉनलाईन होऊन समस्या सोडवली जाईल व समस्या सोडविल्याचा फोन माझ्या शिवालयातुन जाईल तसेच मतदार संघातील शेतकऱ्यांच्या विवीध समस्यांची सोडवणूक या ठिकाणी २४ तास सेवा देवून होणार असल्याची माहीती यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *