कंधारमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

कंधार ;

  कंधार शहर व तालुक्यात 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.

       धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील बौद्धद्वार,भीमनगर,फुलेंनगर,सिद्धार्थनगर,महात्मा फुले हौसिंग सोसायटी,विजयगड, भीमगड,रामरहिमनगर, बहाद्दरपुरा, मानासपुरी आदींसह विविध ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून  त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

        शहरातील भैय्यासाहेब स्मारक भीमगड येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विलास कांबळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विलास कांबळे व नामदेव कांबळे यांनी उपस्थित बौद्ध उपासक,उपसिका यांना त्रिसरण पंचशील दिले. यावेळी बौध्द महासभेचे जितेंद्र ढवळे, निलेश गायकवाड, बी.सी.कांबळे,माजी नगराध्यक्ष रामराव पवार, नाना गायकवाड, प्रा.सदानंद कांबळे, विनोद कांबळे, संतोष आगबोटे,माधव कांबळे, प्रा.अनिल कठारे,नगरसेविका अनिता कदम,यांचेसह बौद्ध उपासक,उपसिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

       सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भिमानुयायांनी गर्दी केली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *