मुंबई (प्रतिनिधी)
वर्षानुवर्षे वेदनादायक आयुष्य जगण्यास भाग पाडणार्या जातींना बळकटी देण्यासाठी भारतीय संविधानाद्वारे प्रयत्न केला गेला. मात्र प्रस्थापित जातींनी जातीव्यवस्था समूळ नष्ट केल्यास आरक्षण सोडण्यास विचार होऊ शकतो असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.
डॉ. माकणिकर पुढे असे म्हणतात की वर्षो नि वर्ष जातींच्या नावाखाली शोषण करून वेदनादायक जीवन जगण्यास भाग पाडले गेले, ज्याला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले गेले, दलित या शिवी ने जातीवाचक संबोधन्यात आले, संवीधानाद्वारे आरक्षण देऊन वंचितांना प्रवाहात आणण्याचा असा प्रयत्न केला आहे, माणूस म्हणून अधिकार देण्यात आले आहेत, जर जातीव्यवस्था प्रस्थापित लोकांद्वारे संपवली तर आरक्षण संपेल असे मानले जाऊ शकते, आणि त्यासाठी आम्ही चिंतन करण्यास तयार आहोत.
जातीव्यवस्था हा एक कलंक आहे, देशाला लागलेला एक अभिशाप आहे, भारत देशाचा जातिव्यवस्थेने नाश केला आहे, जातींचा भेदभाव पसरविला आहे, शोषणवादी मानसिकतेने मोठे झालेले लोक म्हणतात की शेवटच्या जन्माची कर्मे आहेत, तुम्ही या जन्मापासूनच या वर्णात जन्माला आला आहात. म्हणून शूद्र समजून आपणास हेच काम करायचे आहे, अशा लोकांनी मोठ्या वंचितांवर अत्याचार केला आहे, त्यांचा हक्क नाकारला गेला आहे,
ही व्यवस्था संपवून भारताला बळकट करावे लागेल.
जे आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्यांनी जातीव्यवस्था संपऊन रोटी बेटी व्यवहार मानून तसे वर्तन केले तर आम्ही आरक्षण सोडण्याचा विचार करतो. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कनिष्क कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवर पूज्य भदंत शिलबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली जाईल व पुढील कार्यक्रमही आखला जाईल, असे डॉ.राजन माकणिकर यांनी सांगितले.