कंधार ;
कंधार तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक तात्काळ करण्यात यावी अन्यथा कंधार पंचायत कार्यालया समोर चलवाचलवी आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिनांक 29 रोजी गटविकास अधिकारी रहाटकर यांना प्रहार शक्ती च्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शासन निर्णयानुसार कुटुंबप्रमुखाची अट न लावता घरपट्टी 50% माफ करावी, दिव्यांग मित्र नांदेड हा दिव्यांगा चा ऑनलाईन ऍप सुरू करून मंजूर करावा, दिव्यांग कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तालुक्यातील लोणार, बोरी, बिजेवाडी अशा ग्रामपंचायती दिव्यांगा चा पाच टक्के निधी खर्च करत नसल्याने त्यांच्यावर चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी व तात्काळ निधी वाटप करण्याच्या सूचना द्याव्या, प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ विनाअट दिव्यांगांना देण्यात यावा असे निवेदन दिनांक 29 ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे. गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर प्रहार दिव्यांग संस्था शहराध्यक्ष शेख दस्तगीर छोटूमिया यांची स्वाक्षरी आहे.