लोहा ; प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना इलेक्ट्रिकल चाकांवर दहा दिवस प्रशिक्षण देऊन कारागीरांना इलेक्ट्रिकल चाकांचे लहान ता. अर्धापूर येथे वाटप करण्यात आले अशी माहिती युवक अध्यक्ष बालाजी जोरूळे यांनी दिली.
पूर्वी मातीच्या चाकावर काम करताना काठीच्या साह्याने चा करून प्रचंड मेहनत घेऊन कुंभार कारागीर मातीची भांडी बनवत होते परंतु बदलत्या काळात आधुनिक यंत्राच्या साह्याने इलेक्ट्रिकल चाकावर काम केल्यास कमी मेहनतीत व सुरक्षित राहुल खूप मोठ्या प्रमाणात मातीची वेगवेगळी भांडी बनवण्यास मदत होणार आहे.
सदर इलेक्ट्रिकल चा के खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पाठपुराव्याने मिळाली असून त्यासाठी 10 दिवस प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विजय देवडे यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारा नितीनजी गडकरी साहेब व खादी ग्रामोद्योग आयोगाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी मिना साहेब, राजीवजी खन्ना साहेब, शिवशरण साहेब , पी डी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
नांदेड जिल्ह्यात राहिलेल्या कारागिरांना लवकरच खादी ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल मिळवून देण्याचा संकल्प आमचा असून नांदेड जिल्ह्यात क्लस्टरचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राष्ट्रीय माती कला सेलचे चेअरमन श्री दत्ता कुंभार डाळसकर साहेब यांनी विजयराव देवडे यांना दिल्या, त्यासाठी सर्वतोपरी मदत अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने करणार असल्याचे आश्वासन दिले.
या वेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मोहनराव जगदाळे साहेब, प्रदेश अध्यक्ष श्री श्याम शेठ राजे साहेब, राष्ट्रीय माती कला सेल चे चेअरमन श्री दत्ता कुंभार डाळसकर साहेब, विश्वनाथराव कोलमकर साहेब, विजयराव देवडे, व्यंकटराव गोरगीळे, नंदकुमार सांगापुरे, नथुशेठ कुंभार, श्रीराम तेलंग, बाळासाहेब कुंभार, शिवाजीराव पांगरेकर, बालाजी घुमलवाड, शंकरराव नांदेडकर, बालाजी जोरूळे, लक्ष्मण विभुते, उमेश परडे, बालाजी टीमकेकर, डी आय मरकंटे, शिवाजी टीमकीकर, संदीप अवनुरे, काळेश्वर देवडे, गिरीश बिचकुंदे, गणेश येरेवार, मारोती बलुरकर, यांच्या सह इतर पदाधिकारी व खुप मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.