डॉ.यासमिन (उर्फ) निशाद पठाण यांची नँशनल सोशालिस्ट पार्टीच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदि निवड.


नांदेड ; प्रतिनिधी 


पेशाने डॉक्टर असलेल्या व  समाजकार्याची  मनातून तळमळ असलेल्या लाँकडाऊन मध्ये सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने त्यांनी गोरगरीब जनतेला राशेन व इतर जिवन आवश्यक किट चे वाटप केले. सतत तळमळीने  गरिबीची जाण ठेवत आपल्या जिवाची परवा न करता कोरोणा च्या काळात रुग्णांच्या घरी जाऊन महिलांच्या डिलिव्हरी केल्या.

डॉ.निशाद पठाण यांचे पती अनिस पठाण यांनी वेळोवेळी पाठबळ दिले.व आपल्या पत्नीच्या समाजकार्यात आड न येता त्यांना मनोबळ वाढुन प्रत्यक्ष मनापासून सहकार्य केले आहे.यामुळे समाज कार्यास अनिस पठाण यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे.यांच धाडसी कामाची दखल घेत डॉ.यास्मिन पठाण यांची नॅशनल सोशालिस्ट पार्टीच्या नांदेड. जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.अभिजीत आपटे , मा. हेमंत कुमार केळकर, राज्य प्रमुख यांनी पत्र दिले आहे .व मा. संदीप जी हराळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मराठवाडा विभागीय अध्यक्ष मा. सचिन जी शेट्टे ,मराठवाडा मुख्य प्रवक्ते मा.आबासाहेब येडके, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष मा.रमेशजी भारती  ,यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे.

करिता सर्वत्र त्यांचे शुभेच्छा देऊनअभिनंदन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नांदेड खडकपुरा येथे त्यांच्या निवास्थानी सामाजिक,शौक्षणिक,राजकिय या क्षेत्रातील कार्यकत्या कडुन व पत्रकार बंधु कडुन सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव आणि पुढील कार्यासाठी त्यांना खुप खुप शुभेच्छा देण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *