कंधार ; प्रतिनिधी
शिराढोण जिल्हा परिषद सर्कल मधील हळदा या गावी लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त गरजू 110 लोकांना ब्लांकेट वाटपाचा कार्यक्रम दि.३० रोजी घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित अनिलजी मोरे, बालाजीराव पांडागळे, जगदीश शेळके, विठ्ठल पावडे, संदीप सोनकांबळे, दीपक पाटील, दत्ता पाटील शिंदे,ऍड.देवराव पांडागळे, सचिन शिंदे , सतीश देवकत्ते, कमलाकर शिंदे, दत्ता घोरबंड बळीमामा यमलवाड, आत्माराम वाघावाड, शहाजी शिंदे, बाबाराव मोरे, डॉ. गणेश पवळे, अशोक चिखलीकर, त्र्यंबक लाडकेकर, स्वप्नील परोडवाड, ऋषिकेश बसवंते, अक्रम कुरेशी व सर्कल मधील काँग्रेस प्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी अभिजीत हळदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुत्रसंचलन दिनेश मठपती व आभार शहाजी मोरे यांनी मानले.
यावेळी सिनेअभिनेते ताथा माजी सनदी अधिकारी अनिलजी मोरे यांनी सदरील चादरी वाटप कार्यक्रमाचे प्रशंसा करुन माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थंडीच्या दिवसात उब मिळावी म्हणून गरजूना चादर वाटप करुन चांगला उपक्रम हळदेकरांनी राबविल्याचे कौतूक केले.