नांदेड- लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होवून जर कुणाचा मृत्यू झाला तर या राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व गुतेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा — संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांची मागणी

लोहा / प्रतिनिधी
नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर लोहा तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या अपघातात जर कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार राष्ट्रीय राजमार्ग अभियंता व सदरील कामाच्या गुत्तेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनी केंद्र व राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली आहे.


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केले की, नांदेड ते लातूर या राष्ट्रीय महामार्गावर लोहा तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी गत झाली आहे. सदरील कामांचे चौपदरीकरणाचे टेंडर सुटून अनेक दिवस झाले आहेत पण काम अद्याप पर्यंत सुरू झाले नाही.तसेच खड्डे बुजविण्याचे टेंडर ही सुटून अनेक दिवस झाले आहेत तरी अद्याप पर्यंत खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाले नाही काही ठिकाणी थातूरमातूर खडे थोड्या प्रमाणात बुजविले आणि काम अर्धवट सोडून दिले त्यामुळे ते पुढे पाठ मागे सपाट येरे माझ्या मागल्या याप्रमाणे झाले आहे.


रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालविताना नाकी नऊ येतात. खड्डे चुकविण्या च्या नादात अनेक अपघात होत आहेत अनेकांना प्राणाना मुकावे लागले आहे , अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. गुतेदारांची मनमानी व अधिकाऱ्यांची टक्केवारीसाठी हातमिळवणी होत आहे. भ्याड मैं जाये जनता आपना काम बनता याप्रमाणे चालले आहे.


पण हे संभाजी ब्रिगेड कदापी खपवून घेणार नाही जनतेच्या कल्याणासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल व तसेच या खड्डे बुजविण्याच्या कामात जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व गुतेदारावर या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या चा बळी गेल्यास त्याला जबाबदार या राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता व गुत्तेदार यांना धरावे व त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व तात्काळ याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *