मिळतील इथेही भ्रष्ट, काही नतद्रष्ट, वागतील खाष्ट, परी तू शांतss
म्हणतील स्वतःला श्रेष्ठ, तरीही दुष्ट, सांगतो गोष्ट, रहा निश्चिंतss
देतील कधी ना साद, घालतील वाद, सोड तू नाद, अशा व्यक्तींचाss
करतील कुणा फिर्याद, कुठे प्रतिवाद, नको संवाद, अशा नात्यांचाss
सोडून सदाची लाज, केवढी खाज, कशाला माज, एवढा धरतीss
शृंगार करुनी साज, वरुनी बाज, फुका आवाज, केवढा करतीss
वागतो असा की संत, दिखावू पंत, नसे गुणवंत, केवढा तोराss
ना असे मनाची खंत, कशाची भ्रांत, जगे खूशवंत, पिटे धिंडोराss
दाटला मनी अंधार, भुईला भार, बुद्धी बाजार, कशाला करशीss
ठोकून विद्येचे दार, विवेकी मार, सुज्ञ विचार, जीवनी सरशीss
जीवनी सरशीss
जीवनी सरशीss
■■■
© विजो
विजय जोशी
डोंबिवली (मालवण-सिंधुदुर्ग)
९८९२७५२२४२