कंधार; (प्रतिनिधी )
बंजारा समाजाचे धर्मगुरु राष्ट्रसंत. डॉ. रामराव महाराज यांना कंधार येथे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने दि.२ नोव्हेंबर रोजी अभिवादन सभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
पोहरागढ मठ संस्थानचे मठाधिपती. बंजारा समाजाचे धर्मगुरू राष्ट्रसंत रामराव महाराज यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दि. 31 ऑक्टोबर निधन झाले. राष्ट्रसंत रामराव महाराज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण ,सुरेश राठोड यांनी अभिवादन सभा आयोजित केली होती.
या अभिवादन सभेला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
कै. वसंतराव नाईक सभाग्रह. पंचायत समिती कंधार येथे घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत. शिवसेनेचे बाळासाहेब पाटील कराळे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील जाधव, घोरबांड, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पवार, पंचायत समितीचे सदस्य उत्तम चव्हाण, बंजारा क्रांती दलाचे सुंदरसिंग जाधव. भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड, नगरसेवक विनोद पापिंनवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांनी रामराव महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
या अभिवादन सभेला कंधार पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड, माजी सभापती पंडितराव देवकांबळे, माजी सभापती माणिकराव चोपवाड, माजी उपसभापती भीमराव जायभाय, पंचायत समितीचे सदस्य. सत्यनारायण मालपुरे. सुधाकर सूर्यवंशी, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळु पाटील लुंगारे, राजमुद्रा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, काँग्रेस सोशल मीडियाचे सतीश देवकते,
ग्राम रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश राठोड. संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष नितीन कोकाटे, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील वाडेकर, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गंगाधर कांबळे, वाहनचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष माधवरावजी कांबळे, मनमत बाचोटकर, सुधाकर राठोड, पवार, मधुकर चव्हाण, विस्ताराधिकारी शिवाजी ढवळे, तिरुपती गुट्टे, कोटेवाड, अशोक सोनकांबळे, परिषेदेचे रमाकांत फुके. कार्यलियन अधीक्षक तावडे, कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते.