मन्याड खोर्यातील कोहीनूर ;न्यूझीलॅन्ड, युएसए सह विदेशात गाजलेला चित्रकार संकेत सुप्रिया सुनिल कुरुडे

कंधार ; दत्तात्रय एमेकर

मन्याड खोर्यातील मातीत क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरी एक ठळक नगरी आहे.राजकारणी,कलावंत,साहित्यिक सहित अनेक क्षेत्रात नावाजलेली माणसे चमकली.

चित्रकार संकेतचे पणजोबाच्या काळा पासून म्हणजे महादु कुरुडे त्यांचे पुत्र ह.भ.प.माणिक महादु कुरुडे,भाई गुरुनाथराव कुरुडे काका दत्तात्रय कुरुडे या सारख्या कलावंताच्या परिवारात जन्मास आलेला चित्रकार कुमार संकेत  रत्न जन्मले त्यापैकी एक रत्न त्यास वंशपरंपरागत संकेतला कलेचा वारसा लाभला.

माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या परिवारात जन्मलेले,कंधारचे माजी नगराध्यक्ष भाई पंढरीनाथराव कुरुडे यांचे ज्येष्ठ पुत्र सुनिल कुरुडे यांचे सुपुत्र साॅफ्टवेअर इंजीनिअर असून त्यास कलेचा छंद जडला आहे.कलेची कोणतीही पदवी नसतांना वंशपरंपरात आलेल्या कलेच्या अनुवंशिकतेने चित्रकार कुमार संकेत सुप्रिया सुनिल कुरुडे याने काल मला प्रत्यक्ष आऊट डोअर वर्क करतांना पाहण्याचा योग आला.

मी त्याच्या कलेचा मुरीदच झालो.आज पर्यत॔ त्यांची चित्रे न्यूझीलॅन्ड, युएसए सहित अनेक देशात गेली आहेत.तो मन्याड खोर्यांचे नाव लौकीक वाढविणारच….असा ठाम विश्वास वाटतो.त्यांनी माझ्याशी काल संवाद साधतांना मला माझी ओळख कलावंत म्हणुन करायची असून प्रदर्शन भरवण्याचा मनोदय व्यक्त केला.त्यांच्या परिवारातील आजोबा माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे अन् काका माजी सरपंच बहाद्दरपुरा दत्तात्रय कुरुडे यांनी राजकिय क्षेत्राची जवळीकता साधल्याने त्यांच्या कलेची म्हणावी तशी छाप कलावंत म्हणुन पडली नाही.पण ती खंत त्याच्या मनाला बोचते आहे.

मी माझ्या कलेची छाप या संगणकाच्या डिजीटल युगात पाडणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला.त्यांनी आपल्या कलेचे श्रेय चित्रकारटच संकेतने आपल्या आई-वडीलांना दिले आहे.तसेच आजोबा भाई कुरुडे साहेबाना ही तो आदर्श मानतो.त्यांना भेटून चित्रकार संकेतने आपल्या कलाविष्कातून साकारलेली पोट्रेट,लॅडस्केप या प्रकारची चित्र दाखवताच त्यांनी त्यांच्या दडलेल्या चित्रकार ओळखले.त्यास आशीर्वाद देतांना तुझा जाॅब तर आहेच यातून तू वेळ काढून या कलेकडे वेळ देत जा!असे म्हणुन प्रोत्साहन दिले.

असे चित्रकार संकेतने चर्चेअंती सांगीतले.मला माझ्या ग्रामिण भागात फक्त डाॅक्टर व इंजीनिअर या पलिकडे पालकांची इच्छा राहात नाही.तेंव्हा मन्याड खोर्यातील विद्यार्थ्यांना आभ्यासा बरोबर कलेची जोपासना भविष्यात फार महत्वाची आहे.यासाठी मी पहिल्या प्रथम माझ्या ग्रामिण भागात पहिले प्रदर्शन भरवण्याचा मनोदय वाढदिवसाच्या दिनी व्यक्त केला.

त्यांच्या आजोबा कंधारचे माजी नगराध्यक्ष भाई पंढरीनाथराव कुरुडे यांनी त्याच्या कलेचे तोंड भरुन कौतुक करतांना तुझी कला सर्वसामान्यांना डोळे भरुन पाहायला मिळण्यासाठी पहिले प्रदर्शन ग्रामिण भागात प्रदर्शनासाठीच्या मनोदयास उर्जा दिली.त्यांचे काका अनिल पंढरीनाथराव कुरुडे यांनीही सदिच्छा दिल्या.आज पर्य॔त कलेचे माहेरघर,महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात कलेची साधन आरंभली.बारावी उत्तिर्ण झाल्या नंतर खरा कलेकडे वळलो असे त्याने सांगीतले.

संकेतचे प्राथमिक शिक्षण मनोविकास विद्यालय कंधार आणि हायस्कूलचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल कंधार येथे झाले.अकरावी व बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालय नांदेड तर इंजीनिअरिंगचे शिक्षण पुणे येथे झाले.या कोरोनाच्या संकटात लाॅकडाउन झाले अन् मला भरपुर माझ्या कलेसाठी वेळ देता आला.म्हणुन आज पर्यंत बरेचशे पोट्रेट,लॅडस्केप,पेंन्सिल स्केच,कॅन्वास वरील वर्क सहित अनेक माध्यम हाताळता आले.त्यांच्या कलावंत संशातसिंह राजपुत आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पोट्रेटला सर्वात जास्त चाहते मिळाले.

हे चित्रकार संकेतने आवर्जुन सांगीतले. आजच्या वाढदिवसा दिनी कल्पकता हर्षित सदिच्छा देवून भविष्यात उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा!

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

******** video news *****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *