अमिताभ बच्चन, केबीसी ग्रुप व सोनी टीव्हीच्या समर्थनात आर.पी.आय डेमोक्रॅटिक.

मुंबई दि (प्रतिनिधी)

सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असून नाहक कारणासाठी कोणी बच्चन व संबंधितांना त्रास देत असेल तर आरपीआय डेमोक्रॅटिक पार्टी पूर्णपणे समर्थनात उतरेल असा इशारा केंद्रीय महासचीव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी दिला.


डॉ राजन माकणीकर पुढे म्हणाले की कोण बनेगा करोडपती या ज्ञानवर्धक मनोरंजनात्मक कार्यक्रमात अभिनेता अमिताभ बच्चंन द्वारा मनुस्मृती दहन संदर्भात प्रश्न विचारल्यामुळे काही मनुवादी औलादीच्या भावना दुखावल्या असल्याच्या प्रतिक्रिया एकिवात आहेत, मात्र; आर.पी.आय डेमोक्रॅटिक पक्षातर्फे सोनी टीवी केबीसी व त्यांची टीम आणि अमिताभ बच्चन यांचे जाहीर अभिनंदन करून सहर्ष स्वागत करीत असून त्यांचे समर्थन व संरक्षण करणार किंबहुना मनुस्मृती जाळली असली तरी मनूची मानसिकता आजही जिवंत असून मनुस्मृती बद्दल भावनिक होणे म्हणजे फार लज्जास्पद वाटत आहे.


मनुस्मृती ज्या कुणाला मान्य आहे, ज्यांना प्यारी आहे अस्यांनी खुशाल भारतीय संविधानाने दिलेले अधिकार सोडून द्यावेत व मनुस्मृती आचरणात आणावी, आणि मनुस्मृती आचरणात आणण्यासाठी स्वतःच्या घरातील आई बहिणीपासून सुरुवात करावी शिवाय स्वातंत्र, समता, बंधुता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता या मानवी मूल्याच्या उत्कर्षाचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान असतांना मनुस्मृतीच्या माध्यमातून भावनिक बनवून विषमतावादी मूल्यांचे समर्थन करणे म्हणजे मानवतेचे अवमूल्यन होय, असेही डॉ माकणीकर म्हणाले.


अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न हा ऐतिहासिक असून वास्तववादी आहे, असेच प्रेरणादायी प्रश्न पुढे विचारले जावोत, मनुवादी शक्ती लुडबुड करत असल्यास पुन्हा पुन्हा मनुस्मृती दहन करून अश्या शक्तींचे बुड शेकवू असेही माकणीकर म्हणाले.
भारतीय संविधान माध्यमिक शालेय अभ्यासक्रमात सर्व राज्यतील सरकारने सक्तीने शिकवनित सहभागी करावे यासाठी मागील 10 वर्षपासून पाठपुरावा आम्ही करत असून संविधान साक्षर भारत ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.


बौद्ध धर्मगुरू पूज्य भदंत शिलबोधी, राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, महाराष्ट्र राज्य महासचिव श्रावण गायकवाड, मराठवाडा प्रमुख वसंत लांमतुरे, समाजसेवक वीरेंद्र लगाडे यांच्या वतीने मनुवादी विचारांचे सावट देशातूल घालविण्यासाठी सम्यक मैत्रेय फौंडेशन, दि बुध्दांज बोधी ट्री, पँथर ऑफ सम्यक योद्धा, व आर पी आय डेमोक्रॅटिक पक्षाच्या माध्यमातून समविधानाचा प्रचार व प्रसार केला जात आहे असेही डॉ माकणीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *