नांदेड ; प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आत्मनिर्भर भारतीय संकल्पनेअंतर्गत आत्मनिर्भर केंद्र उभारण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहीती भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी दिली.
त्यासंदर्भात दि.५ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या बैठकीसाठी भाजयुमोचे प्रदेश सदस्य व आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक श्री.हर्षवर्धन जी कराड,प्रवीण जी साले,संजय भाऊ घोगरे ,आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.आत्मनिर्भर संकल्पनेअंतर्गत पुढील काळातील नियोजन यासंदर्भात अतिशय सविस्तर चर्चा करण्यात आली.