लव्ह जिहाद प्रकरणी करणी सेना विश्व हिंदू परिषद तथा तत्सम संघटनांनी आरोपींना अटक केली पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. उत्तर प्रदेशातील फरीदाबाद शहरातील एका कॉलेज युवतीची कॉलेजच्या गेटबाहेरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थींनी बी-कॉम च्या तिसऱ्या वर्गात शिकत होती, सोमवारी सायंकाळी चार वाजता पेपर देऊन कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. बल्लभगढ येथील अग्रवाल कॉलेजबाहेर ही घटना घडली. या घटनेनंतर संतप्त जमावाने सोहना-बल्लभगढ रस्त्यावर रास्ता रोको केला.
उत्तर प्रदेशच्या हापूल येथील मूळ रहिवाशी असलेल्या निकिता तोमरचे कुटुंबीय फरीदाबाद येथे शिफ्ट झाले होते. याप्रकरणी मुलीचे वडिल मूलचंद तोमर यांनी सांगितले की, तौशीफ नावाचा मुस्लीम कुटुंबातील मुलगा १२ वी पर्यंत निकीतासोबतच शिक्षण घेत होता. यावेळी, निकीतासोबत मैत्री करण्याचा प्रयत्नही त्याने अनेकदा केला असून तिचे धर्मांतर करण्याचा त्याचा डाव होता. मैत्री आणि जबरदस्ती विवाहासाठी नकार दिल्यानंतर तौशीफने सन २०१८ साली निकाताचे अपहरण केले. मात्र, बदनामीच्या कारणास्तव त्यावेळी कुटुंबीयांना ते प्रकरण आपापसात मिटवले.
वडिलांच्या सांगण्यानुसार, त्या दिवशी परीक्षा देण्यासाठी निकीता कॉलेजला गेली होती. पेपर सुटल्यानंतर सायंकाळी चार वाजता तिची आई आणि भाऊ कॉलेजबाहेर निकीची वाट पाहत होते. त्यावेळी, अचानक एक कार तेथे आली, त्या कारमधून आलेल्या तीन ते चार जणांनी निकीताला गाडीत खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये, तौशीफ सर्वात पुढे होता. मात्र, निकिताच्या भावाला पाहिल्यानंतर तौशीफने निकीतावर गोळी झाडली. शेजारीच असलेल्या निकीताच्या मैत्रिणीने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निकिताल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले
भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरु या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जर तुम्ही समस्या स्विकारत नसाल तर, त्याचे समाधानच होणार नाही. आज निकिता बळी गेली, उद्या आणखी कोण?… असा सवाल करत लव्ह जिहाद नाकारता येणार नसल्याचं प्रिती गांधी यांनी म्हटलं आहे.
लव्ह जिहादची एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. अशिक्षित शाकीबने अमन अशी ओळख सांगून बी.कॉम पर्यंत शिकलेल्या मुलीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर लग्नाच्या नावाखाली त्याने तरुणीला २५ लाख रुपये आणि मुलीचे १५ तोळे सोने आणण्यास सांगितले.
जेव्हा तरुणीला कळाले तो अमन नसून शाकीब आहे तेव्हा तिच्या पायाखालची जणू जमीनच सरकली आणि खोट्या प्रेमाचं खरं सत्य उघडकीस आले. त्यावेळी निर्दयी शाकीबने ईदच्याआधी चंद्र दिसण्याच्या दिवशीच्या रात्री कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीने अंगावर काटा आणेल असे हत्याकांड घडवून आणले, त्याने युवतीचे धड आणि हात तोडले आणि शरीरापासून वेगळे केले.
मूळची हिमाचल प्रदेशातील डेहरा कांगरा येथील रहिवासी असलेली मुलगी बी.कॉमपर्यंत शिकून लुधियानास्थित कंपनीत नोकरीला लागली. त्यानंतर लवकरच, मुलीचे कुटुंब देखील लुधियाना येथे वास्तव्यास होते. त्याठिकाणी तरुणी मेरठच्या लोहया गावातल्या एका तरूणाला भेटली. भेटीनंतर शाकिबने अमन अशी ओळख दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जवळपास तीन महिन्यांच्या प्रेमसंबंधानंतर तो तिला ईदच्या आधी आपल्या गावी घेऊन गेला.
त्याचवेळी जेव्हा तरुणीला वास्तव कळले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. त्यापासून तरुणीने तरुणास विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शाकिबने ईदच्या अगदी एक दिवस आधी चंद्र दिसण्याच्या रात्री कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने तिची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्दयी शाकीबने त्या महिलेचे धड आणि हात कापले. धड एका विटेला बांधून तलावामध्ये फेकला गेला, तर हात आणि शरीर शेतात खोदलेल्या खड्यात पुरले गेले.
लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नसल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं लोकसभेत दिली. लव्ह जिहादसारख्या कोणत्याही प्रकरणाची माहिती केंद्रीय तपास यंत्रणांनी दिली नसल्याचं आणि अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणाची नोंद आपल्याकडे नसल्याचंदेखील गृह मंत्रालयाकडून लोकसभेत सांगण्यात आलं. केरळमध्ये लव्ह जिहादचं कोणतंही प्रकरण नसल्याचं केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं होतं. याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गृह मंत्रालयानं लिखित स्वरुपात उत्तर दिलं.
लव्ह जिहादबद्दल गृह मंत्रालयानं लोकसभेत लिखित स्वरुपात दिलेल्या उत्तरात सध्याच्या कायद्यांचा उल्लेख आहे. ‘लव्ह जिहादची कोणतीही व्याख्या कायद्यात नाही. केंद्रीय यंत्रणांकडेही लव्ह जिहादशी संबंधित कोणतीही माहिती नाही. केरळमध्ये दोन आंतरजातीय विवाहाची प्रकरणं समोर आली होती. याची चौकशी एनआयएकडून करण्यात आली होती,’ असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत आंतरजातीय विवाहांची प्रकरणं समोर आली होती. त्यातलं हादिया प्रकरण देशभरात चर्चेत राहिलं होतं. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर यामध्ये लव्ह जिहादचा विषय नसल्याचं समोर आलं. गेल्याच महिन्यात केरळमधल्या एका चर्चनं लव्ह जिहाद वास्तव असल्याचा दावा केला होता. दक्षिणेकडील राज्यांमधल्या ख्रिश्चन तरुणींना फसवून त्यांचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात असल्याचं चर्चेनं म्हटलं होतं. विश्व हिंदू परिषदेनं चर्चच्या या विधानाचं स्वागत केलं होतं. लव्ह जिहाद केरळसाठी मोठं आव्हान असून त्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलं होतं.
महाराष्ट्रातील अकोला शहरातील एका विवाहित युवकाचा जठारपेठेतील २२ वर्षीय युवतीसोबत आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न खामगावातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी उधळून लावला आणि जोडप्याला खामगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, अकोल्यात राहणारा आसिफ खान नुर खान (३२) हा विवाहित असून, त्याला तीन मुली आणि दोन मुले आहेत. त्याने पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली आहे. दरम्यान, त्याने जठारपेठमध्ये राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवतीला प्रेमजाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले. युवती लग्न करण्यासाठी तयार झाल्यामुळे तो कोर्ट मॅरेज करण्याच्या उद्देशाने खामगाव न्यायालयात घेऊन आला.
खामगाव बसस्थानकावरून आॅटोरिक्षाने न्यायालयात जात असताना आॅटोरिक्षा चालकास आसिफ खानचा संशय आला. आॅटोरिक्षा चालकाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने न्यायालय परिसरात पोहोचून आसिफ खान नुर खान याच्यासह युवतीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह उधळल्या गेला. या ठिकाणी आसिफ खान याची पत्नी शमीना परवीन हीसुद्धा पोलीस ठाण्यात पोहोचली. आसिफ खान याच्याविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. युवतीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
हादियाच्या शफीन जहान याच्याशी लग्न करण्याच्या निवडीबद्दल फाजील चौकशा करण्यापासून राष्ट्रीय तपासणी संस्थेने (एनआयए) दूर राहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हादियाचा पती शफीन जहान याने केलेल्या विनंतीवर न्यायालय सुनावणी घेताना वरील आदेश दिला. जहान हा २६ वर्षांचा असून, तो होमिओपॅथीचा विद्यार्थी आहे. हादियाने जहानशी लग्न करण्याच्या आधी हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला. त्याबाबत एनआयएने न्यायालयात युक्तिवाद केला की, हादियाच्या मनावर बिंबविण्यात आले, तिला नवा धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. तिला सापळ््यात अडकविण्यासाठी लग्न ही युक्ती होती.
एनआयए व हादियाचे वडील के. एम. अशोकन यांनी जहान हा मूलतत्त्ववादी गटांमध्ये भरती करण्याचे काम करणारा असल्याचा दावा केला होता. तुम्ही कोणतीही चौकशी करू शकता, परंतु तिने चांगल्या व्यक्तीशी लग्न केले की वाईट याची चौकशी करू शकत नाही. ती तिची निवड आहे, तिचा अधिकार असे सरन्यायाधीश म्हणाले. तिने चांगला पती निवडला की वाईट हे फक्त तिलाच माहीत. तिची निवड काय असावी, याबद्दल न्यायालय प्रश्न विचारू शकत नाही, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले. लग्न व आयुष्याच्या जोडीदाराबद्दलची निवड या गोष्टी गुन्हेगारी कटकारस्थाने, गुन्हेगारी आरोप व कृती यापासून वेगळी ठेवायला हवीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
दुसरीकडे सध्या देशात केरळमधील लव्ह जिहाद प्रकरण चर्चेत आहे. अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या आदेश दिला. तिच्या वडिलांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ‘आमच्या कुटुंबात कोणाही दहशतवाद्याला स्थान नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
आंतरधर्मीय जोडप्यांची व विशेषत: हिंदू मुलगी व मुस्लीम पुरूष अशा जोडप्यांची नावं असलेली १०० जणांची लिस्ट नुकतीच व्हायरल झाली होती व हा लव्ह जिहादचा दाखला असल्याचं सांगण्यात आलं होतं. या जोडप्यांना धमक्या देण्यात येतील व काही हिंसक घटना घडू शकतील अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. ती खरी ठरली असून या यादीमधल्या एका जोडप्यानं कोलकाता पोलिस ठाण्यात धमकीची तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार या यादीतल्या एका जोडप्यानं केली आहे.
फेसुबक व ट्विटरवर गेल्या महिन्यांत १०० जोडप्यांच्या प्रोफाइलची यादी व्हायरल झाली होती. हिंदू मुली लव्ह जिहादच्या शिकार होत असून या यादीमध्ये जे पुरूष आहेत त्यांना शोधून त्यांची शिकार हिंदू वाघांनी करावी अशी उघड चिथावणीदेखील देण्यात आली होती. हिंदू वार्ता नावानं असलेल्या फेसबुकपेजवर ही चिथावणी देण्यात येत होती, जे नंतर डिलीट करण्यात आले.
तर विश्व हिंदू परिषदेचे बिपलब चट्टोपाध्याय यांनी हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या माध्यमातून इस्लाम स्वीकारण्यास बाग पाडण्यात येत असल्याचा आरोप केला होता आणि हिंदूंनी जागं व्हावं अन्यथा भारत गमावाल अशी चिथावणी दिली होती.
या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधल्या हिंदू मुलगी व मुस्लीम तरूण असलेल्या एका जोडप्याला त्या व्हायरल पोस्टनंतर धमक्या येण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरही त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. आम्हाला काही जणांनी लक्ष्ये केलंय तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्यात अशी या जोडप्यानं तक्रार केली आहे.
माझ्या मैत्रिणीनं त्या यादीत आमच्या दोघांची नावं बगितलं आणि ती गर्भगळीत झाली व तिनं ही बाब माझ्या निदर्शनास आणली असं त्या तरूणानं म्हटलं आहे. तिला सोशल मीडियावर त्रास देण्यात आल्याचं व त्यामुळे तिनं सोशल मीडियाच सोडल्याचं त्या तरुणानं सांगितलं.
तर या यादीत नाव आलेल्या दुसऱ्या एका मुलीच्या वडिलांनी माजी मुलगी एका प्रतिष्ठित कंपनीत काम करते, ती घरी आली की पोलीसांत तक्रार करायची का नाही याचा निर्णय घेऊ असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
तर याच यादीतल्या आणखी एका मुलीनं तो मुला माझा आधी बॉयफ्रेंड होता परंतु आता त्याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हटलंय. तसंच आपल्या जीवाला काही धोका होईल का अशी भीतीही तिला सतावत आहे. तर मोहम्मद शाहिद नावाच्या तरुणानं त्या यादीत नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. एक मुस्लीम मुलगा व हिंदू मुलगी मित्रमैत्रीण असू शकत नाहीत का असा सवाल त्यानं विचारला आहे. आमच्याबद्दल असं लिहायचा कुणाला अधिकार नसल्याचं सांगत आपण पोलिसांकडे तक्रार करू शकतो असं त्यानं म्हटलं आहे.
हिंदू मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा व नंतर त्यांचं धर्मपरीवर्तन करण्यात येत असल्याचा आरोप चट्टोपाध्याय यांनी केला आहे. हिंदू मुलगा मुस्लीम मुलीसी लग्न करतो तेव्हा त्याचा खून करण्यात येतो त्यावेळी मात्र प्रसारमाध्यमं दखल घेत नाहीत असा आरोपही चट्टोपाध्याय यांनी केला आहे.
आंतरधर्मीय विवाहाला आईवडिलांनी विरोध केल्याने मुलासोबत घरातून निघून गेलेल्या नागपूरमधील तरुणीची शुक्रवारी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगद्वारे साक्ष घेण्यात आली. स्वेच्छेने विवाह केल्याचे तरुणीने म्हटले असून मुलीच्या साक्षीमुळे लव्ह जिहादचे राजकारण करणाऱ्या बजरंग दलाला चपराक बसली.
नागपूरमधील मोहम्मद आरिफ आणि मोनिका उर्फ आयत या दाम्पत्याने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. २९ ऑगस्टरोजी दोघांनी विवाहदेखील केला. विवाहाची नोंदणी करण्यासाठी दाम्पत्य निबंधक कार्यालयाकडे गेले असता त्यांना पोलिसांना याची माहिती देण्यास सांगितले. दाम्पत्याने इमामवाडा पोलीस ठाण्यात दस्तावेज सादर केले. मात्र याची माहिती बजरंग दलाला समजली आणि त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरिफच्या कुटुंबीयांनाही धमक्या येत होत्या. पोलिसांची बजरंग दलाला साथ असल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता. शेवटी या दाम्पत्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीडाकडे धाव घेतली. पोलिसांच्या त्रासामुळे आम्हाला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आणि संरक्षण द्यावे अशी विनंती त्यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. न्यायमूर्ती वासंती नाईक आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली होती. हायकोर्टाने तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष घेण्याचे आदेश इमामवाडा पोलिसांना दिले होते.
कर्नाटकमधील म्हैसूर येथील हिंदू संघटनांच्या धमक्यांना न घाबरता हिंदू तरुणी आणि मुसलमान तरुणाने प्रेमविवाह केला. म्हैसूर येथील अशिता बाबू आणि शकील अहमद बारा वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. हिंदू संघटनांकडून होत असलेला विरोध झुगारून अशिता आणि शकीलने लग्न करण्याचे धाडस केले. शकीलबरोबर लग्न करण्यासाठी आठवड्याभरापूर्वी अशिताने धर्मपरिवर्तन करून शाइस्ता नाव धारण केले. त्यांच्या निकाहाच्या ठिकाणी हिंदू संघटनांनी जोरदार निदर्शने केली. बजरंग दल आणि अन्य हिंदू संघटनांचा दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. परंतु, अशिता आणि शकीलचे कुटुंबीय दोघांच्या लग्नाविषयी ठाम होते.
एकमेकांच्या शेजारी राहात असलेल्या अशिता आणि शकीलने शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण बरोबर घेतले असून, दोघांनी एमबीएचे शिक्षणदेखील एकत्र घेतले आहे. त्यांच्या लग्नाला दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणताही विरोध नसताना अशिता आणि शकीलमधील प्रेमसंबंध ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत काही हिंदू संघटना यास विरोध करू लागल्या. असे असले तरी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून दोन्ही कुटुंबाना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले.
हा ‘लव्ह जिहाद’ असल्याचे सांगत, जर हे खरोखरीच प्रेम असेल तर आम्हाला काही अडचण नाही. परंतु, हा जबरदस्तीचा मामला दिसत असल्याचे मत कर्नाटकमधील विश्व हिंदू परिषदेचे सचिव बी सुरेश यांनी या लग्नाविषयी बोलताना व्यक्त केले.
दोन्ही कुटुंबियांनी लग्नाला होत असलेल्या विरोधामुळे आपल्या आनंदावर विरजण पडू दिले नाही. अशिताचे वडिल नरेंद्र बाबू डॉक्टर असून लग्नाच्या ठिकाणी जाताना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भारतात आपण सर्व समान आहोत. यातून विरोधकांना हाच संदेश जातो. त्यांना हे कळणे गरजेचे आहे. सर्वजण आनंदी असून बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींच्या विरोधामुळे काही फरक पडत नाही.
मुस्लिम तरूणांशी लग्न करून दुसऱ्या धर्मात गेलेल्या महिलांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासाठी सुरू करण्यात अभियानासाठी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरच्या छायाचित्राचा वापर करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) ‘दुर्गा वाहिनी’ या महिला आघाडीने हे अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून हिंदू संघटनांनी ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेला पुन्हा एकदा विरोध करण्यास सुरूवात केली आहे. दुर्गा वाहिनीच्या उत्तर भारतातील समन्वयक रजनी ठकराल यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘हिमालय ध्वनी’ या मासिकाच्या ताज्या अंकात ‘घर वापसी’ अभियानाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे. आपला मुद्दा अधिक परिमाणकारकरित्या मांडण्यासाठी अंकाच्या मुखपृष्ठावर अभिनेत्री करिना कपूरच्या छायाचित्राला मॉर्फ करून मुस्लिम स्त्रियांची ओळख असणाऱ्या नकाबाने तिचा अर्धा चेहरा झाकण्यात आला आहे. या छायाचित्राखाली ‘धर्मांतरण ते राष्ट्रांतरण’ असा ठळक मथळाही छापण्यात आला आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार किळसवाणा असून, असल्या फालतू प्रचाराला जास्त महत्त्व देऊ नये, अशी प्रतिक्रिया करिनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान याने दिली होती.
लव्ह जिहाद’ म्हणजे नेमके काय हे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहीत नसले, तरी महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पोलीस दल मात्र त्याबाबतीत अतिशय हुशार आहे. त्यांना केवळ या शब्दाचा अर्थच माहीत आहे असे नाही, तर राज्यात तशी किती प्रकरणे घडली आहेत याचीही बित्तंबातमी आहे. राज्य पोलिसांनी माहितीच्या अधिकारात तसे कबूलच करून टाकले आहे. काही महिन्यांपासून काही हिंदूुत्ववादी संघटनांनी ‘लव्ह जिहाद’वरून वादंग माजवले आहे. मात्र त्याबाबत केवळ केंद्रीय गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले असे नाही, तर त्याची नेमकी व्याख्या काय असे विचारून तो मुद्दाच उडवून लावला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही ही प्रसारमाध्यमांचीच निर्मिती आहे असे सांगत तसे वास्तव नसल्याचे स्पष्ट केले. असे असताना महाराष्ट्र पोलिसांनी मात्र राज्यात असे प्रकार घडत असल्याचे सांगत ‘लव्ह जिहाद’ नामक प्रकार अस्तित्वात असल्याचेच मान्य केले.
हिंदू जनजागृती समितीने याबाबत पोलीस महासंचालकांकडून माहिती मागविली होती. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्वाक्षरीने त्या अर्जाला उत्तर देण्यात आले. त्यात ‘राज्यातील लव्ह जिहादची प्रकरणे’ अशा सुस्पष्ट उल्लेखाने आकडेवारी देण्यात आली. हिंदू जनजागृती समितीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ती जाहीर केली. त्याबाबत विचारणा केल्यानंतर मात्र देवेन भारती यांनी ही केवळ प्रसारमाध्यमांत गाजलेली हिंदूू-मुस्लिम वादग्रस्त विवाहांची आकडेवारी असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ‘लव्ह जिहाद’ नावाने कोणतीही आकडेवारी गोळा करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरयाणामधील बल्लभगडमध्ये निकिता हत्याकांडवरून नागरिकांमध्ये रोष आहे. दरम्यान, केंद्र सरकार ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या चौकशीच्या मार्गांचा विचार करत आहे, असा दावा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी केला. तर मुली आणि बहिणींच्या अब्रुशी कुणी खेळत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हणाले होते.
लव्ह जिहाद’ प्रकरणं राज्य सरकार गांभीरतेने घेत आहे आणि अशा प्रकरणी कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्ग किंवा तरतुदींचा विचार केला जात आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांबाबत केंद्र सरकारही कारवाईच्या विविध मार्गांवर विचार करत आहे. पण निर्दोष व्यक्ती यात फसू नये याची खबरदारीही घेतली जाईल, असं मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले.
‘लव्ह जिहाद’ थांबवणं आवश्यक आहे. यापासून आपण अल्पवयीन मुलींना वाचवू शकू. यासाठी गरज पडल्यास कायदा करावा लागला किंवा आम्हाला आणखी काही करायचं असल्यास तेही आम्ही करू, असं हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितलं. हरयाणामध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधात कायद्या बनवण्याचा विचार केला जात आहे. हरयाणा विधानसभेचं अधिवेशन ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, असं अनिल विज म्हणाले. राज्य सरकार ‘लव्ह जिहाद’ थांबवण्यासाठी कठोर पावलं उचलेल. फसवून बहिणी-मुलींच्या अब्रुशी खेळलात आणि सुधरला नाही तर ‘राम नाम सत्य है’ची यात्रा निघेल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी निवडणूक सभेत दिली.
लग्न, विवाहांसाठी धर्मांतर करण्याची आवश्यकता नाही, असे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. धर्मांतर करू नये. याला मंजुरी मिळणार नाही. यामुळे ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोरपणे कार्य करू आणि प्रभावी कायदाही बनवू, असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा या मुस्लिमविरोधी असलेल्या लव-जिहाद संकल्पनेला प्रोत्साहन देत आहेत. तसेच वैधानिक पदावर असूनही धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करत नसल्याचे स्पष्ट होत आहे’, असा दावा करून त्यांना पदावरून दूर करण्याच्या विनंतीची याचिका आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
‘शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांसोबत महिलांची सुरक्षा व वाढत्या लव-जिहाद प्रकरणांच्या प्रश्नावर चर्चा केल्याचे ट्विटमध्ये म्हटले. लव जिहाद नावाची कोणती संकल्पनाच भारतीय कायद्यांत नाही. तरीही केवळ मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी सध्या वापरल्या जात असलेल्या या संकल्पनेविषयी बोलून वैधानिक पदावरील शर्मा या समाजातील सौहार्दपूर्ण वातावरणालाच एकप्रकारे धक्का लावत आहेत. मुस्लिम तरुणांकडून हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव-जिहादचा कट रचला जात आहे, अशी निराधार आरोपबाजी समाजात होत असते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी निवाडा करताना आपल्या स्वतंत्र देशात आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाहांतील प्रकरणांत संबंधितांचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली. अशावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच लव-जिहादचा उल्लेख करून राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २१ व २५मधील तरतुदींचेच उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्या या पदावर कार्यरत राहण्यास पात्र नसून त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश द्यावेत’, अशी विनंती गोखले यांनी आपल्या याचिकेत केली आहे. ही याचिका लवकरच सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
‘लव्ह जिहाद’ या शब्दावरून देशात काही ठिकाणी वाद सुरू आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर ‘लव्ह जिहाद’ या शब्दाचा वाद महाराष्ट्रापर्यंतही येऊन पोहचला. उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून याच मुद्यावरून अशांती पसरलेली दिसतेय. एका हिंदू कुटुंबानं एका मुस्लीम तरुणावर आपली मुलगी पळवून नेल्याचा आरोप केला. हे ‘लव्ह जिहाद’चं प्रकरण असल्याचं सांगत पोलीस स्टेशनमध्ये तोडफोडही करण्यात आली. किल्ला स्टेशनच्या बाहेर मंगळवारी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला, यात अनेक जण जखमी झालेत. भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेनं या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानं या कौटुंबिक वादाला राजकीय वळण मिळालं.
काही दिवसांपूर्वी ‘तनिष्क’ या ज्वेलरी ब्रँडच्या एका जाहिरातीचाही वाद समोर आला होता. या जाहिरातीवर ‘लव्ह जिदाह’ला प्रोत्साहन देण्याचा आरोपी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला. त्यानंतर कंपनीनं आपली जाहिरात मागे घेतलीय. परंतु, या जाहिरातीत आक्षेपार्ह काहीही नसल्याचं अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार, मुस्लीम तरूण कथितरित्या हिंदू तरुणींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. हा प्रेमाचा बनाव केवळ धर्मांतरणासाठी केला जातो. तसंच मुलींचा शारीरिक आणि लैंगिक छळही केला जातो. हिंदुत्ववाद्यांकडून आपली खरी ओळख लपवून (विशेषत: मुस्लीम धर्म) मुलीला फसवण्याच्या प्रकाराला ‘लव्ह जिहाद’ संबोधलं जातं. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण बरंच तापवलं जात आहे.
दक्षिणपंथी समुदायांच्या म्हणण्यानुसार, ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात आहे. परंतु, सध्याच्या कायद्यामध्ये ‘लव्ह जिहाद’ सारखी काही संज्ञाच अस्तित्वात नसल्याचा खुलासा काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला होता. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना, ‘लव्ह जिहाद’ची कायद्यात कोणतीही परिभाषा नाही आणि ‘लव्ह जिहाद’शी संबंधित एकही प्रकरण सरकारपर्यंत आलेलं नाही, असा खुलासा रेड्डी यांनी केला होता. संविधानाने कोणताही धर्म स्वीकारण्याचं त्याचा प्रचार-प्रसार करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केल होतं. लव्ह जिहाद’ ही संकल्पना भारतात दोन – तीन दशकांपेक्षा जास्त जुनी नाही. जर्मनीत राहणाऱ्या पीएचडी स्कॉलर आस्था त्यागी यांच्या म्हणण्यानुसार, ‘लव्ह जिहाद या संकल्पनेचा वापर गुजरातमध्ये ९०च्या दशकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला होत होता. त्यावेळी लव्ह जिहादचा अर्थ सरळ सरळ मुस्लीम तरुण हिंदू तरुणींना फसवतात. खासकरून दांडिया सारख्या सामुदायिक कार्यक्रमात आणि मग त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जातं’ असा घेतला जात होता. केरळमध्येही ‘लव्ह जिहाद’च प्रकरण उच्च न्यायालयानं मान्य करत एका जोडप्याचा विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला होता.
दिल्ली विद्यापीठाच्या इतिहासकार चारु गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात लव्ह जिहादची चर्चा देशभरातील हिंदू संघटनांच्या कार्यक्रमात होऊ लागली होती. श्रीराम सेनेचे नेते प्रमोद मुथालिक यांनी याच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर २००९ साली पहिल्यांदा केरळ आणि कर्नाटकात हिंदू मुलींचे धर्म परिवर्तनाची प्रकरणं समोर आली. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, २० व्या शतकात जी प्रकरणं समोर आली त्यात अनेक मुलींनी धर्म परिवर्तनही करत विवाह केला होता. परंतु, यातील अर्ध्याहून अधिक मुली निराधार होत्या. गुप्ता यांच्या अभ्यासानुसार, १९२७ साली प्रतापगढमध्ये एका हिंदू महिलेनं मुस्लीम तरुणासोबत पळून जाऊन विवाह केला होता. बनारसमध्ये १९२४ साली एका महिलेनं मुस्लीम पुरुषासाठी आपल्या पतीला सोडलं होतं. एप्रिल १९२७ मध्ये झाशीत एका मुस्लीम व्यक्तीनं एका मूळ हिंदू महिलेला वेश्या म्हणून ठेवल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.
आग्र्याची प्रमिला सज्जन यांनी केलेल्या आरोपानुसार, त्यांची मुलगी संजना हिला २०१८ मध्ये एका मुस्लीम तरुणानं आपल्यासोबत नेलं. तेव्हापासून संजनानं केवळ एकदाच घरी फोन केला तेही आपल्या लग्नाची बातमी देण्यासाठी… यावेळी प्रमिलानं आपण परत येणार नसल्याचं सांगितल्याचंही तिच्या आईनं म्हटलंय. प्रमिला यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचं ‘ब्रेनवॉश’ करण्यात आलंय.
१९२७ साली एका हिंदू मुलीचं जबरदस्तीनं धर्मांतरण करून तिचा विवाह जबरदस्तीनं मुस्लीम तरुणाशी लावण्यात आल्याच्या वावड्या उठल्या आणि मुजफ्फरनगरची शांती भंगली. लोक एकत्र जमले आणि गर्दीनं आरोपीच्या घराकडे कूचही केली. त्यानंतर मुलगी अगोदरपासूनच मुस्लीम असल्याचं समोर आलं आणि या वादातली हवाच निघून गेली. महत्त्वाचं म्हणजे, यावेळी ‘लव्ह जिहाद’ हा शब्दही वापरला जात नव्हता.
प्रत्येक आंतरधर्मीय किंवा विशेषत: हिंदू-मुसलमान विवाह हा ‘लव्ह जिहाद’ ठरवला जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेत एक पुरुषी पगडाही दिसून येतो. सध्या चर्चिल्या जाणाऱ्या ‘लव्ह जिहाद’ या संकल्पनेत तरुणींना आपला धर्म निवडण्याचा हक्क किंवा स्वतंत्र विचार हा मुद्दा कुठेच दिसून येत नाही. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय भिन्न धर्मीय व्यक्तीशी विवाह प्रकरणांतही ‘लव्ह जिहाद’ या शब्दाचा सर्रास वापर होताना दिसतोय. परंतु, भारताच्या संविधानानं ‘विशेष विवाह कायद्यानुसार’ दोन भिन्न धर्मीय सज्ञान व्यक्तींना धर्म न बदलता विवाहबद्ध होता येतं. या दोन्ही व्यक्तींना कोणतेही धार्मिक विधी न करता रजिस्ट्रेशन पद्धतीने विवाह करण्यसाठी विवाह प्रबंधकाच्या कार्यालयात रीतसर नोटीस द्यावी लागते. अशा दाम्पत्यांना इतरांप्रमाणेच घटस्फोट, पोटगी इ. मिळविण्याचे कायदेशीर हक्क अबाधित आहेत.
लव्ह जिहाद’ म्हणजे ‘धर्मांध मुसलमानांनी फसव्या प्रेमाच्या माध्यमातून हिंदू अन् खिस्ती समाजांविरुद्ध पुकारलेले युद्ध’, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. हिंदु स्त्रिया लव्ह जिहादला बळी पडू नयेत यासाठी संपूर्ण हिंदु समाजाने योग्य ती काळजी घेणे ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे. हिंदूंनो, आता संघटित होऊन ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला नामोहरम करूया आणि हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवा ! अशी हाक हिंदू जनजागृती समितीने दिली आहे.
हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांचे विवाह यापूर्वीही झाले असून त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वच मुलींना मुसलमान व्हावे लागले आहे. दिलीपकुमार (युसूफ खान) यांच्या बहिणीने एका हिंदूशी विवाह केला आणि त्याला मुसलमान करून घेतले. यावरून मुसलमान शिक्षित असले, तरी ते स्वतः धर्मांतरित न होता दुसर्याला धर्मांतर करायला लावतात. यावरून लव्ह जिहादचा प्रकार लक्षात येतो.
पूर्वी तुरळकपणे घडणार्या या घटना आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या कृती आता नियोजनबद्धपणे, संघटितपणे आणि त्याला आवश्यक तो निधी पुरवून एक उपक्रम राबवल्याप्रमाणे करण्यात येत आहेत. केवळ मेरठ (उत्तर प्रदेश) जिल्ह्यामध्ये ४५ दिवसांत ५३ अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत. यावरून या प्रश्नाची दाहकता स्पष्ट होते.
भारताशी बंदुकीच्या बळावर जिहाद करता येत नाही, हे धर्मांधांच्या लक्षात आले आहे; म्हणून भारतच नव्हे, तर जगभरातील धर्मांधांनी हे छुपे युद्ध पुकारले आहे.
ज्याप्रमाणे मुसलमान आक्रमक त्यांच्यासोबत जनानखाना ठेवत आणि प्रत्येक ठिकाणी हिंदु महिलांची त्यात भर करत, त्याचीच छोटी आवृत्ती म्हणजे लव्ह जिहाद आहे.
हिंदू जनजागृती समिती ही या संदर्भात फार सजग आहे. या समितीने याचे मूळ आणि कूळ शोधले आहे. काय करावे व काय नको याबाबत सविस्तर मार्गदर्शन ही समिती करीत आहे.
लव्ह जिहादची प्रकरणे पाहिल्यास प्रत्येक प्रकरणात मुलीवर धर्मांतरित होण्यासाठी दबाव आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच हा विषय धर्माशी संबंधित आहे. खरे प्रेम करणारा पुरुष त्या मुलीच्या प्रेमापोटी हिंदु का होत नाही ?
या तरुणींना नंतर धर्माच्या कामासाठी म्हणजे जिहादसाठी वापरण्यात येते, मुले प्रसवण्याची यंत्रे बनवले जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायाला लावले जाते. या तरुणींचा जिहादसाठी वापर होत असल्याने जिहाद शब्द येणे साहजिक आहे.
महाविद्यालयीन हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी अनेक मुसलमान तरुणांना वाहने, पैसा आदी पुरवला जातो आणि ते महाविद्यालयांसमोर जाऊन त्या मुलींना फसवतात. हे सर्व एकाच पंथाचे असून मुसलमानेतर मुलींनाच लक्ष्य करतात. यावरून यामध्ये धर्माचा संबंध येतोच येतो.
ही फसवणूक असली, तरी तिचा मूळ उद्देश तरुणीचे धर्मांतर करणे, स्वतःचा धर्म वाढवणे, तिचा अपलाभ घेणे, तिच्या जिवाचे बरे-वाईट करणे, असा असतो. त्यामुळे लव्ह जिहादला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत नसून मुळातच तो पंथाधारित कार्यक्रम धर्मांधांकडून राबवण्यात येत आहे.
हिंदुत्ववादी संघटनांना राजकारण करून कोणताही राजकीय लाभ उठवायचा नाही. त्यांना धर्मरक्षण करायचे आहे. त्यामुळे त्या या प्रकरणात लक्ष घालत आहेत. हिंदुत्ववादी पक्ष यामध्ये लक्ष घालतात; मात्र त्यांना याचे केवळ राजकारण करायचे आहे, असे म्हणणे चूक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. धर्म टिकला, तर राष्ट्र टिकते. त्यामुळे या संदर्भात हिंदुत्ववादी पक्षांनी बोलणे, हे राष्ट्रांतराला विरोध केल्यासारखेच आहे.
आज मराठा पक्ष मराठा आरक्षण मागतो, मुसलमानांचा पक्ष मुसलमानांसाठी आरक्षण मागतो. त्यांना घटनेने ते अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणे हिंदुत्ववादी पक्ष जर हिंदु महिलांच्या सुरक्षेची मागणी करत असेल, तर त्यात चूक ते काय ? जे हिंदुत्ववादी पक्षांना विरोध करतात, त्यांना हिंदु महिला सुरक्षित रहाव्यात, असे वाटत नाही का ?
इमाम बुखारी मुसलमानांना धर्माच्या आधारावर मते देण्याचे आवाहन करतात, त्याप्रमाणे हिंदुत्ववादी पक्षांनी कुठेही आवाहन केलेले नाही. ते हे सर्व कर्तव्य म्हणून करत असतील आणि त्याचा त्यांना राजकीय लाभ होणार असेल, तर तो का नाकारावा ? शरद पवारही मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर त्याचा लाभ घेणे चुकीचे नाही, असेच म्हणतात.
हिंदुत्ववादी पक्ष हिंदूंच्या अस्तित्वासाठी यामध्ये उतरत असून राजकीय लाभ होणे, हे त्यांच्यासाठी दुय्यम असेल. लव्ह जिहाद हा एक धार्मिक आतंकवादच आहे, असे मानले जाते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्यांचे बळजोरीने धर्मपरिर्तन करायचे, हा आतंकवादच आहे. ही पद्धत सर्व घटनांमध्ये सारखीच असल्याने, हा धार्मिक आतंकवाद आहे.
२. आतंकवादी कृत्य संघटितपणे धर्मांधांच्या टोळ्यांकडून केले जाते. त्याचप्रमाणे धर्मांधांची टोळी एखाद्या हिंदु मुलीला फूस लावण्यासाठी कार्यरत असते. त्यामध्ये मुसलमान तरुणीही हिंदु मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्यास साहाय्य करतात.
३. आतंकवाद्यांना कुणीतरी पैसा पुरवणारा निराळा असतो, लव्ह जिहादमध्येही तसेच आहे.
४. इस्लामी जिहादी आतंकवाद्यांचा मूळ हेतू विश्वाचे इस्लामीकरण करणे असा आहे, तोच हेतू लव्ह जिहादचाही आहे.
कोईम्बतूर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेतील बाँबस्फोट प्रकरणी अटक झालेली मुसलमान महिला ही विवाहापूर्वीची हिंदु तरुणी होती. केरळमध्ये आतंकवाद्यांना कारागृहात चोरून भ्रमणभाषचे सीमकार्ड पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केलेली तरुणीसुद्धा मुसलमानाशी विवाह करण्यापूर्वी हिंदु होती. अशी विदेशातीलही अनेक उदाहरणे आहेत. यातून हिंदु अन् ख्रिस्ती मुलींचा आतंकवादासाठी वापर होतांना स्पष्ट दिसत आहे. केरळच्या साम्यवादी पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनीही हा उल्लेख २७ जुलै २०१० मध्ये केला होता. त्यावर खळबळही माजली होती.
प्रेम करण्याला जात-धर्म नसतो असे म्हटले जाते. हाच प्रश्न तुम्ही मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा प्रेम करत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना विचारायला हवा असे म्हटले जाते. कायद्याने सज्ञान मुलगी स्वतःचे भवितव्य ठरवू शकत असली, तरी केवळ याचा लाभ घेऊन हिंदूंच्या मुलींना फसवून त्यांना आतंकवादी चळवळीत ओढण्याला प्रेम म्हणता येणार नाही. त्यामुळे हे खरे प्रेम नसून प्रेमाच्या नावे टाकलेले जाळे आहे.
लव्ह जिहाद हे पाककडून अर्थसाहाय्य पुरवून भारतात धर्मांमध्ये तणाव वाढवण्यासाठी असलेले षड्यंत्र आहे, असे आयबीएन् ७ या वृत्तवाहिनीने जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात भारतात जागृती होण्यासाठी कर्तव्य म्हणून लव्ह जिहादवरील पुस्तकांचे वितरण केले जात आहे.
देशाच्या, धर्माच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, हे एक सूज्ञ नागरिक म्हणून घटनेने सांगितलेलेे कर्तव्य आहे. या आतंकवादाच्या प्रकारांची उदा. बनावट नोटा भारतात पसरवणे, अमली पदार्थांचे युवकांना व्यसन लावणे, तसेच प्रेमाच्या माध्यमातून फसवणे असे काही प्रकार होत असतात.
हिंदू मुलींचा मौल्यवान ठेवा जपून आपला सांस्कृतिक वारसा वाचवणे हिंदु समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच ‘लव्ह जिहाद’च्या समस्येच्या संदर्भात प्रवचनकार, धर्मपिठे आणि साधू-संत यांचे दायित्व महत्त्वाचे आहे.
कठीण प्रसंगी उपस्थित हिंदूंकडून साहाय्य मिळावे, यासाठी कपाळावर प्रतिदिन कुंकू लावले पाहिजे. मुसलमान मित्र वा शेजारी असल्यास त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. वासनांधांपासून स्वरक्षण करण्यासाठी कराटे, नानचाकू आदी स्वसंरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण घ्यायला हवे. हिंदू पालकांनी घ्यावयाची दक्षता म्हणजे मुलीच्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनाविषयी जाणून घेतले पाहिजे. मुलीच्या दैनंदिन वागण्यावर लक्ष ठेवा. तिच्या शाळा किंवा महाविद्यालय यांच्या वेळांची नोंद स्वतःजवळ ठेवली पाहिजे. मुलीचे मित्र आणि मैत्रिणी यांचे संपर्क क्रमांक स्वतःकडे असू द्या. वेळोवेळी त्यांच्याकडून स्वतःच्या मुलीच्या वर्तनाविषयी जाणून घ्यायला हवे.
‘स्कार्फ’ बांधल्याने दुचाकीवरील ‘लव्ह जिहादी’च्या मागे बसलेल्या मुलीला ओळखणे कठीण जाते, हे लक्षात ठेवून तिच्या ‘स्कार्फ’ बांधण्याविषयीसुद्धा दक्षता घ्यावी. महाविद्यालयातील कार्यक्रमांत अन्य मुलांसह मुलगी सहभागी होत असल्यास, त्याविषयी जाणून घ्यायचे आहे. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात घुटमळणार्या अनोळखी मुसलमान युवकांची माहिती त्वरित हिंदुत्ववादी संघटनांना दिली पाहिजे.
नवी वेषभूषा, अलंकार, महागडा ‘मोबाईल’, ‘कॅमेरा’ इत्यादी वस्तूंची मुलीला असलेली आवश्यकता अभ्यासून मगच त्या तिला उपलब्ध करून द्यावेत. `लव्ह जिहाद’ची काही प्रकरणे ही ‘मोबाईल’च्या साहाय्याने घडली असल्यामुळे ‘आपल्या मुलीच्या ‘मोबाईल’वर कोणाचे दूरध्वनी येतात’, याची अधूनमधून पडताळणी (तपासणी) करा ! मुलीच्या ‘मोबाईल’मध्ये ‘सेव्ह’ केलेला ‘लव्ह जिहादी’ मुलाचा क्रमांक खोट्या नावाने असू शकतो, हेही लक्षात असू द्या !
मुलीशी सातत्याने सुसंवाद साधून तिला मनमोकळे बोलू द्यावे.
वयात येण्याच्या काळात मुलीत शारीरिक अन् मानसिक पालट होत असतात. या काळात तिला प्रेमाने वागवा. तिच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण व्हायला हवी. प्रतिदिन मुलीशी थोडा वेळ अनौपचारिक संवाद साधून तिच्या मनातील जाणा अन् तिने सहज संवाद साधावा असे कौटुंबिक वातावरण निर्माण करायला हवे.
लहानपणापासून मुलीला धर्मशिक्षण देऊन सुसंस्कारित केले पाहिजे. धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे यांमुळे हिंदू मुली धर्मांतरित होतात, यासाठी लहानपणापासून मुलीवर हिंदू धर्मातील कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नीतीमूल्यांचे संस्कार करा !
हिंदू कुटुंबात आणि हिंदुस्थानात जन्म झाल्याचा अभिमान मुलीमध्ये जागवायला हवा.हिंदू सभ्यतेला साजेल, अशी वेशभूषा करण्याचा संस्कार मुलीवर केले पाहिजेत. धर्मसत्संग, राष्ट्रपुरुषांविषयीचे कार्यक्रम आदी उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी मुलीला प्रोत्साहन द्यायला हवे. हिंदु संस्कृती, हिंदु धर्मातील ग्रंथ, हिंदु धर्माचा इतिहास, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आदी गोष्टींचे महत्त्व मुलीला समजावून सांगितले पाहिजे.
मुलीला हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा यांचे शिक्षण म्हणजेच धर्मशिक्षण द्या म्हणजे ती धर्माचरणी बनेल.
मुलीला मुसलमान स्त्रीच्या यातनामय जीवनाची ओळख करून द्यावी लागेल. बहुपत्नीत्व, बुरखा, तलाक, आर्थिक परावलंबित्व, मारहाण आणि मुलांचे लटांबर, हे मुसलमान स्त्रीच्या वाट्याला असलेले दैनंदिन भोग आहेत. त्याची जाणीव प्रत्येक हिंदू पालकाने त्यांच्या मुलींना वयात येण्याच्या काळात करून द्यायला हवी. ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याची ओळख मुलीला करून दिलीच पाहिजे. ‘मुलीला केवळ हिंदु धर्माची महती सांगितल्याने धर्मांतरे थांबणार नाहीत. ती थोपवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याची ओळख मुलीला करून द्यायला पाहिजे आहे.
स्वाभाविक मैत्रीच्या भावनेने मुसलमान मुलांच्या संपर्कात असणारी मुलगी : अशा मुलीमध्ये तिच्या हिंदू मैत्रिणी, मित्र, प्राध्यापक आणि पालक यांच्या साहाय्याने जागृती करावी.
मुसलमान मुलांशी असलेल्या दाट मैत्रीमुळे त्यांच्याशी शारीरिक जवळीक निर्माण झाल्याने सारासार विचार गमावलेली मुलगी : अशा मुलीवर वशीकरण किंवा करणी यांचा प्रयोग झाला आहे, असे वाटल्यास या लेखात सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय करावेत. नंतर मुलीचा सुयोग्य हिंदू मुलाशी विवाह करावा.
पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवावी. हिंदू मुलीचे वय १८ वर्षांहून अधिक असेल, तर ‘ती तिच्या इच्छेने पळून गेली’, असे नोंदवून पोलीस अदखलपात्र गुन्हा नोंदवतात. त्यामुळे गुन्हा नोंदवतांनाच ‘मुलीला पळवून नेले’, असे पालकांनी सांगणे आवश्यक आहे.
वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच सज्ञान झाल्याविना तरुण-तरुणींनी स्वेच्छेने धर्म पालटणे, हा कायद्यानुसार अपराध ठरतो. त्यामुळे सज्ञान नसतांना धर्मांतर करून अन्य धर्मियाशी केलेला विवाह आणि धर्मांतर कायद्यान्वये अवैध ठरतो. अशा प्रकरणांत संबंधितांचे पालक ‘मुलीचे बळाने धर्मांतर किंवा विवाह झाले’, अशी तक्रार करू शकतात.
सज्ञान झाल्यानंतर, म्हणजेच तिच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तरुणीने बलपूर्वक धर्मांतर झाल्याची तक्रार तिने केली, तर ते धर्मांतर अवैध ठरते. धर्मांतर अवैध ठरल्यामुळे झालेला निकाहही अवैध ठरतो.
स्वतःच्या झालेल्या छळाविषयी कुठल्याही तरुणीने गार्हाणे दिल्यास संबंधित आरोपी कोणत्याही धर्माचा असला, तरी तो पुढील कलमांनुसार शिक्षेस पात्र ठरतो. बलात्कार करणे (भादंवि ३७५, ३७६) आ.फसवणूक करणे (भादंवि ४१५ ते ४२०) इ. अपहरण करणे (भादंवि ३५९) ई. संमतीविरुद्ध अश्लील प्रसंगाचे छायाचित्र काढणे वा चित्रीकरण करणे आणि त्याच्या साहाय्याने युवतीला प्रतिमाहनन करण्याच्या धमक्या (ब्लॅकमेलिंग) देणे. एखादी तरुणी हरवली, तर शेजारीही पोलिसात फिर्याद नोंदवू शकतात.
हिंदू विवाहित स्त्रीने किंवा पुरुषाने घटस्फोट न घेता धर्मांतर करून दुसरा विवाह केल्यास पहिला विवाह विच्छेद न झाल्याने दुसरा विवाह भारतीय दंडसंहिता कलम ४९४ आणि ४९५ यांनुसार धर्मांतर करूनसुद्धा अनधिकृत ठरतो. ‘लव्ह जिहादी’कडून फसवणूक झाल्याचे ओळखून परत आलेली मुलगी अशा मुलीचा विवाह आणि धर्मांतर झाले असल्यास त्याविषयीच्या कायदेशीर अडचणी सोडवून तिला स्वधर्मात विधिवत प्रवेश द्यावा. अशा मुलीचा आत्मविश्वास हरवलेला असल्याने तिला समुपदेशन करण्यासाठी मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे. तसेच तिचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न करावेत.
मुसलमान तरुणांना एका वेळी ४ महिलांशी विवाह करण्याची अनुमती इस्लाम देतो. त्यामुळे ते हिंदू मुलींशी एकनिष्ठ रहातील, याची शाश्वती देता येत नाही. मुसलमान तरुणांनी २-३ विवाह झालेले असतांना हिंदू मुलींना ‘मी अविवाहित आहे’, असे सांगून फसवल्याचे शेकडो प्रकार घडलेले आहेत. मुसलमान हिंदू तरुणींना एक उपभोग्य वस्तू समजत असल्याने ते त्यांच्या प्रेमभावनांचा यत्किंचितही विचार करत नाहीत.
मुसलमानाकडून एकदा शील भ्रष्ट झाले, तर ते पुन्हा मिळवता येत नाही आणि स्त्रीच्या जीवनात तिच्या शिलापेक्षा अधिक मौल्यवान गोष्ट कुठलीही नाही. अल्लाउद्दीन खिलजीसारख्या मुसलमानांपासून स्वतःचे शील रक्षिण्यासाठी संपूर्ण शरीरच अग्नीच्या स्वाधीन करणार्या रजपूत स्त्रिया याच आपल्या आदर्श आहेत.
परधर्मात जाणे, हे अत्यंत भयावह (नरकसमान) असते.’ हिंदू म्हणून जन्माला येऊन इस्लाम धर्म स्वीकारणार्या मुलींच्या मनावर हिंदु धर्माचे संस्कार असतात. त्यामुळे त्यांना इस्लाम धर्माप्रमाणे कृती करणे अतिशय अवघड जाते. विश्वात हिंदु धर्म हा महान असून तो ईश्वरप्राप्ती करून देणारा एकमेव धर्म आहे. तत्कालिक सुख मिळवण्यासाठी परधर्मात जाणे, म्हणजे स्वतःच्या पारलौकिक जीवनाचा शेवट करण्यासारखे आहे.
मुसलमानांनी बळाचा वापर केल्यामुळे अनेक हिंदू तरुणी ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. विवाह झाल्यावर मुसलमान नवरा तुमच्यावर बुरख्याची सक्ती करू शकतो. पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो लंडनमध्ये असेपर्यंत ‘जीन्स’ घालत होत्या. विवाह झाल्यानंतर त्यांना तोंडावर बुरखा घ्यावा लागला.
हिंदू पती कुटुंबनियोजन मानतो, तर मुसलमान नवरा तुम्हाला ‘मुले प्रसवण्याचे यंत्र’ समजतो. हिंदूंसाठी ‘द्विभार्या प्रतिबंधक कायदा’ आहे. इस्लाममध्ये एका वेळी चार बायका करता येतात. पाचवी बायको करायची असेल, तर पहिल्या चौघींपैकी एकीला तोंडी तलाक दिला जातो. हिंदू स्त्रीला घटस्फोटानंतर कायदेशीर पोटगी मिळते, तर मुसलमानाने तलाक दिल्यावर पत्नीला कवडीही मिळत नाही. सासर्याने सूनेशी संबंध ठेवणे, इस्लामला मान्य आहे. असे झाल्यास सून ‘सासर्याची पत्नी’ आणि ‘स्वतःच्या पतीची आई’ समजली जाते.
‘एका पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानाने सांगितले, ‘‘हिंदू मुलींना फसवणे सोपे असते; कारण त्या भोळ्या असतात आणि कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. त्यांच्याशी गोड बोलून त्यांची खोटी स्तुती केली की, त्यांना आम्ही ‘जिहादी’ त्यांचेच वाटतो.’ ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या बहुतेक हिंदू मुली या १३ ते १८ वर्षे वयोगटातीलच असतात. या अल्लड वयातील मुलींना मुसलमान फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात. त्या मुली अल्पवयातील लैंगिक आकर्षणामुळे ‘काय चांगले अन् काय वाईट’ यांतील भेद जाणत नाही. त्यामुळे त्यांचा पाय प्रेमात घसरतो.’
मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याशी विवाह करणे : काही हिंदू युवतींना इस्लामी क्रौर्याचा इतिहास ज्ञात असतो; पण ‘एका तरी मुसलमानाला आपण राष्ट्रीय प्रवाहात आणून त्याची मानसिकता पालटू शकतो’, असा अपसमज त्या अननुभवी वयात करून घेतात आणि स्वतःचा घात करून घेतात. मुसलमानांना पौरुषत्व असलेले आणि हिंदूंना पौरुषत्वहीन समजले जाते. ‘मुसलमानांच्या प्रेमपाशात अडकलेल्या मुलींचे प्रबोधन करायला गेले, तर त्या ‘‘मुसलमान पौरुषत्व असलेले (मर्द) आहेत, तर हिंदू ‘नामर्द (पौरुषत्वहीन) असतात’’, असे सांगून हिंदूंच्या पुरुषार्थालाच आव्हान देतात.
इस्लामी आक्रमकांचा इतिहास ज्ञात नसतो. हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात, याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना इस्लामी आक्रमकांनी १,३०० वर्षे हिंदुस्थानवर केलेले अत्याचार आणि इस्लामची जिहादी विचारसरणी यांचे ज्ञान नसते, हे होय. हिंदू मुलींना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे, हेही त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अशा मुलींकडून धर्मपालन केले जात नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माविषयी अभिमान नसतो आणि म्हणूनच त्या परधर्मात जाण्यास सिद्ध होतात. पालकांकडून हिंदू मुलींना दिले जाणारे अनिर्बंध स्वातंत्र्य अन् त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी दिली जाणारी मुभा, यांमुळे त्या मुली पालकांना पुढे पुढे जुमानीत नाहीत.
‘एका सर्वेक्षणानुसार एकट्या किंवा अलीप्त रहाणार्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्या मुलींना भावनिक आधार मिळत नाही, त्या मुली तो आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलीला तिच्या डोक्यावर हात फिरवून आस्थेने चौकशी करणारे आणि तिचे बोलणे ऐकणारे पालक हवे असतात. ‘सर्वधर्मसमभाव’ जपण्यासाठी मुसलमानांचे खरे स्वरूप दाखवणार्या घटना मुलींपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. एका मारवाडी संमेलनात ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलींच्या पालकांनी ‘‘आमच्या मुली धार्मिक विचारांच्या होत्या. पूजा-अर्चा आणि उपवास करायच्या, तरीही त्या मुसलमानांसमवेत पळून गेल्या’’, अशा शब्दांत त्यांची व्यथा मांडली. हेच पालक पूर्वी ‘सर्वधर्मसमभाव’चे खोटे तत्त्वज्ञान समाजाला सांगत असत. परिस्थितीमुळे कधी हिंदू-मुसलमान प्रश्न समोर आलेच, तर मुलीशी बोलतांना ‘‘ते तुझे विषय नाहीत, ते राजकारण असते. तू तुझ्या भवितव्याकडे लक्ष दे’’, असा ‘सर्वधर्मसमभावी’ उपदेश ते करत.
काही पालक त्यांची मुलगी कुठल्या ‘पाट्र्यां’मध्ये जाते, कुठल्या स्तराच्या मुलांसह सहलीला जाते, कुठले चित्रपट पहाते, कुठल्या कार्यक्रमांत भाग घेते आदींची कधीही चिकित्सा करत नाहीत. उलट ‘त्यांची मुलगी आधुनिक विचारांची आहे’, याचा त्यांना आत्मघातकी अभिमान असतो. प्रतिमा कलंकित होण्याच्या भयापोटी पालक हतबल होतात. ‘लव्ह जिहाद’ला मुलगी बळी पडल्यास त्याविषयी आई-वडील पोलिसांत तक्रार नोंदवतात; पण समाजात स्वतःची प्रतिमा कलंकित होण्याच्या भीतीमुळे न्यायालयाच्या बाहेरच ते प्रकरण मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.’
‘मला काय त्याचे’ अशी वृत्ती : ‘एका हिंदू घरातील मुलगी मुसलमानाने पळवून नेल्यावर ‘आपल्या घरातील मुलीबाळी तर सुरक्षित आहेत ना ? मग कशाला करायचा विचार ?’, असा विचार अन्य हिंदूंच्या मनात असतो.’
‘मुसलमान पळवत असलेल्या हिंदू तरुणींचा टाहो हिंदू समाजातील काहींना ऐकूच येत नाही; कारण त्यांनी न वितळणारे धर्मनिरपेक्षतेचे उष्ण शिसे कानांच्या दोन भोकांत ओतून घेतलेले असते.
हिंदू समाज आपापसांत भांडण्यात वा एकमेकांची उणी-दुणी काढण्यात मोठेपणा मानतो. वेगवेगळ्या हिंदू संघटनांमध्ये स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो. हिंदु धर्म आणि त्याच्यावर आलेली संकटे यांविषयी त्याला काही देणे-घेणे नसते.’
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय
५.११.२०२०