७ महिने विना सुट्टी कोविड ड्युटी करणाऱ्या शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी;फक्त ५ दिवसांची सुट्टी….!

शालेय विभागाचा नवा आदेश

पुणे;

कोरोना महामारीच्या संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत, परंतु ऑनलाईन शिक्षण चालू आहे. दिवाळी सणाच्या ५ दिवसाच्या सुट्टया राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पूर्ण ७ महिने बऱ्याच ठिकाणी शिक्षकांनी कोविड संबंधी कामे केली आहेत, त्यामुळे ह्या सुट्ट्या महत्वाच्या असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, राज्यातील शाळा कोविड१९ च्या महामारीमुळे प्रत्यक्षात सुरु करणे शक्य नसल्याने दि. १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले होते. पूर्व प्राथमिक ते इ.१२ वी विद्यार्थाना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे.

इ.१ ली ते ५वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील किमान २०० कामाचे दिवस व ६ वी ते ८वीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील किमान २२० कामाचे दिवस तसेच माध्यमिक शाळांसाठी २३० कामाचे दिवस होणे आवश्यक आहे.

शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने दिनांक १२ नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दिवाळी सण असल्याने शाळांना सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन पध्दतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असे आदेशात म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *