अहमदपूर ( प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त, सुंदर हस्ताक्षर अकँडमी द्वारा आयोजित राज्यस्तरीय आँनलाईन काव्यस्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे आयोजन कवी डॉ अकबर लाला यांनी केले होते. यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि र्ततीय क्रमांक महिलांनीच पटकावला.
उस्मानाबादची कवयित्री कु साक्षी गायकवाड हिने प्रथम क्रमांक, अहमदपूरकरांची लाडकी लेक, लगडे : माळी वर्षा वसंतराव यांनी द्वितीय क्रमांक ,तर सौ रशिदा इस्माईल तांबोळी, बार्शी यांनी सर्व र्ततीय क्रमांक पटकावला .पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित असणाऱ्या सर्व उत्कृष्ट कविंचा सहभागी प्रमाण पत्र, शाल आणि पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यीक एन डी राठोड, उद्घघाटक संगीत, साहित्य, कला अकादमीचे संस्थापक डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य तुकाराम हारगीले, प्रा बसवेश्वर थोटे आणि प्रा भगवान आमलापूरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुंदर हस्ताक्षर अकँडमीचे संचालक सय्यद शाहरुख, सय्यद अजहर, सय्यद शोएब, क्रष्णा राजपंके आणि कवी संजयकुमार भोसले यांनी परिश्रम घेतले. सर्व कवयित्रींचा सत्कार प्रा सय्यद यास्मिन, एस एन डी टी महाविद्यालय, मुंबई यांनी केला. तर बहारदार सुत्रसंचालन कवी डॉ अकबर लाला यांनी केले. अध्यक्षीय समारोपाच्या नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.