कंधार
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे अख्ख जग मेटाकुटीला आले असतांनाच, मी मात्र जाम वैतागलो.माझ्या वरुन जातांना वहानधारकांना अगदी जीव मुठीत धरुन ये-जा करावे लागत आहे.
दररोज माझ्या रस्त्यावर हजारो लहान-सहान वहाने चालतात.
माझ्या भारतात संपुर्ण देशभर हाय-वेचे जाळे विणने सुरु असतांना माझी ही दशा कुणी केली?का केली?कशासाठी केली?असे अनेक प्रश्न मला भेडसावत आहेत.माझेशअंतरच एक-दोन फर्लांगाचे पण…माझी दुर्दशा ही राजकारण्यांनी केली सार्वजनिक बांधकाम खात्याने का मतदारांनी?हा यक्ष प्रश्न रात्रंदिन मला भेडसावतो आहे.सध्याची माझी परिस्थिती दाबुन धरुन बुक्याचा मार सोसावी लागणारीच आहे.
माझ्यावरुन प्रवास करणारा प्रत्येक वाहनधारक खडसावून शिव्या घालतो आहे….त्या शिव्या सार्वजनिक करण्यास माझ्या मनाला लाज वाटते आहे;त्या वाहनातला प्रवाशीतर शिव्यांची लाखोळी वाहते आहे.पण मला नाईलाजास्तव हे सर्व निमुटपणे सोसावे लागत आहे.अनेक वाहनांची नट-बोल्ट सैल होवून त्या मोठ्या वाहनांचे पाटे तुटत आहेत;तर अॅटो,मोटार सायकल खिळखीळ होत असुन त्यांना रोजच त्यांच्या मालकांना नट-बोल्ट आहेत का गळाले याची शहनिशा रोजच करावी लागत आहे.
मी पुर्वी आहे तसा बराच होतो म्हणन्याची वेळ माझ्यावर आली आहे.कुणी माझ्यावर खर्च होणारे बजेट संपले असे म्हणते आहे तर कुणी बजेट इतरत्र हलवले.पण कांही असो माझ्यावर खर्च होणारे बजेट पुर्ण नव्हते तर मला उकरुन दुरुस्त करण्याचे नाटकच केले कशासाठी!माझ्या दुतर्फा जी वृक्षवल्ली होती ती तर जेसीबीच्या साह्याने नार्दयीपणे मुळासकट उपटली;पण नविन रोपण न करता हा माझ्यावरचा अन्याय सांगु कुणाला?ऐकणारे आहे कोण?माझे गत वैभव इतिहास जमा झाले.तर वर्तमानात हालाखीचे जीवन निशिबी आले.
या पुर्वी श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार जवळील वीर नागीजी नाईंकांच्या चौकात अगदी रस्त्याच्या मधोमध माझ्यावरच भगदाड पडले होते तेंव्हा नगरपालिकाच्या कक्षातले का?सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षातले या दोघांच्या वादात ते भगदाड अनेकांना माझ्यावर लोटांगण घ्यायला भाग पाडले होते… पण आता तर वादाचा प्रश्नच नाही.सरळ-सरळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आवाक्यातला प्रश्न आहे.त्या भगदाडास देखील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींनी बोलके केले होते.
आज पण माझी बकाल अवस्था पाहून त्यांना राहावले नाही.त्यांनी आज दि.6 नोव्हेबर 2020 रोजी माझी यातना बोलक्या शल्यातून मांडून मला चक्क बोलके केल्यामुळे माझे गार्हाने शासन व संबंधीत अधिकारी आणि यातना भोगणार्या नागरीका पर्यंत पोहण्यास मदत झाली.त्या बद्दल सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे मनापासून आभाराभिनंदन करतो.
सध्या सगळीकडे ग्राम पंचायत निवडणुकिचे वारे वाहू लागण्यास सुरुवात झाली आहे.माझ्या एका टोकाला कायद्याचे महाविद्यालय व निधड्या छातीचे वीररत्न नागोजी नाईक साहेब तर दुसर्या टोकाला स्वराज्या संस्थापक जणता राजा,विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे दोन्ही महात्मे माझी बकाल अवस्था पाहून खिन्न होत आहेत.ही माझ्या दृष्टीने दु:खाची व मानाला यातना देणारी बाब आहे.अन् कायद्याचे काॅलेज माझ्या कडे केविलवाणे पाहत आहे.
माझ्या वरुन ज्या तालूक्याला नागरीक ये-जा करतात त्याच मन्याड खोर्यातील भुमिपुत्र पानशेवडी तंड्याचे रहिवासी आदरणीय विजयजी चव्हाण साहेब मामलेदार म्हणुन लाभले.पाहू या या माझ्या तालुक्याच्या भुमीपुत्रास तरी माझी यातना कळाली तर; ते नक्कीच माझी बकाल आवस्था सुधारतील असा आशावाद मला वाटतो आहे.
दु:ख शब्दांतून माडतांना,
मन मात्र हुंदकेच देते!
वर्तमान परिस्थिती पाहुन,
अश्रू नेत्रातून ओघळते!
कुणाला माझ्या दु:खाचे सोयर-सुतक नाही.हे खेदाने मांडतांना माझे गार्हाणे ऐकणारे कोण आहे.
कारण आता आमदार किंवा खासदार निवडण्याची वेळ आणखी दोन-तीन वर्षात नाही,म्हणुन लोकशाहीतील राजे माझ्या अवस्थेकडे ढुकुणही पाहणार नाहीत?याची खातरजमा माझ्या मनाला झाली आहे; अपवाद फक्त त्यांच्या असलेल्या मानवता मनाला पाझर फुटल्यास माझ्या परिस्थितीचा विचार होईल अन्यथा…..माझी अवहेलना तर कोणी संपवू शकत नाही.हा एखादा निरापराध नागरीकास नाहक जीव गमवावा लागेल.तेंव्हा कुठे शासनाच्या दरबारी माझी दखल घेतल्या जाईल….
वर्तमानातल्या परिस्थिने मला वाटते आहे.एव्हढेच काय मला मुळातून उकरुन एकसमान करण्याच्या कामाचे पैसे देखील संबंधीत गुत्तेदार बंधुना मिळाले नाहीत असे माझ्या कानावर आहे.माझे अस्तित्व केंद्र आणि राज्याच्या उदासीनतेत अडकुन राहू नये हीच अपेक्षा…?सध्या माझी परिस्थिती आयसीयू मध्ये ऑक्सिजन वर असणारा शेवटची घटका मोजणार्या पेशंट सारखी झाली आहे.माझ्यावरुन जीवघेणा प्रवास करणार्या वाहनधारकांना व प्रवाश्यांना हात जोडुन विनंती करतो की,आपापला जीव सहिसलामत ठेवून माझ्यावर भरवसा न ठेवता काळजी पुर्वक प्रवास करावे ही माझी सर्वांना नम्र विनंती.
आता बस्स झाले माझे शल्य सांगणे शेवटी सर्वांना दीपावलीच्या मनस्वी सदिच्छा देतो.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारचे सुलेखनकार,क्रांतिभुवन बहाद्दरपुरी दत्तात्रय एमेकर गुरुजींचे आभार मानतो अन् थांबतो हं!
#शल्यकार
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
9860809931