कंधार ; प्रतिनिधी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत अखेर कंधारच्या व्यापारी संकुलनासाठी 20 कोटी रूपये( ₹ 20,00,000,00 ) मंजूर करण्यात आले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची कंधारकरांना 20 कोटीची दिवाळी भेट असल्याचे बोलल्या जात असून अतिक्रमणात उध्वस्त झालेल्या कंधारला आता निश्चितपणे व्यापारी गाळे उभारल्या जातील असा विश्वास व्यापारीवर्गानी आला आहे.
एक तपापेक्षाही अधिक काळ या प्रश्नावर राजकीय पेच डावपेच खेळले गेले. उपोषण काले गेले. विरोधकांनी कुत्सित भावनेने केवळ कुणाला तरी श्रेय जाईल या कुबुद्धीने कायम विरोधच केलेला आहे. हे सर्वच नागरिक जाणतात.
शहरातील व्यापारी संकुलाच्या विषयावर नगराध्यक्ष शोभाताई नळगे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सातत्याने केलेल्या मागणीकडे लक्ष देऊन सदर मागणीला प्रतिसाद देत व्यापारी संकुल यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याने शहरातील व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण म्हणून शहरातील दुतर्फा व्यापारी संकुल जमीनदोस केले. त्यानंतर येथील व्यापारी संकुलाचा वाद शिगेला पोहोचला होता. तसेच यासंदर्भात मोर्चा काढण्यात आला होता .दरम्यान नगराध्यक्ष सौ.शोभाताई नळगे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन नगरपालिकेच्या वतीने व्यापारी संकुल बांधण्याचा ठराव नगरपालीकेच्या सभेत संमत केला.त्यातही त्यासाठी आवश्यक निधी साठी काही राजकीय मंडळींनी विरोध दर्शवला होता .दरम्यान सदर व्यापारी संकुलणासाठी 20 कोटीचा निधी मंजूर झाल्यामुळे तब्बल एक तप रखडलेला व्यापारी गाळ्याचा समोरचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
सगळ्या विरोधकांच्या विरोधाची धार बोथट करत युवानेते नगरसेवक शहाजी अरविंदराव नळगे आणि नगरसेवक मन्नानजी चौधरी यांनी व्यापारी संकुलनासाठी आवश्यक निधी मंजूर करून आणला आणि दिवाळीच्या तोंडावर व्यापारी बांधवांसह कंधार नगरीतील नागरिकांना दिवाळी भेटच दिली आहे.कंधारकरांनी शहाजी अरविंदराव नळगे यांचे
अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.