स्काऊट गाईड चळवळीचा 70 वा वर्धापन दिवस उत्सहात साजरा

नांदेड;

 नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेच्या 7 नोंव्हेबर वर्धापन दिवस भारतातील विविध संस्था सुद्धा त्यांच्या स्थापना दिनानिमित्त उदा. एन.सी.सी,फ्लँग डे,सैनिक डे,वनदिन,पर्यावरण दिन,अंध मुकबधीर दिन,बालक दिन,इत्यादी ध्वजदिन साजरा करतात.त्या धर्तीवर भारत स्काऊटस् आणि गाईडस् संस्थेतर्फे १० रु.चे ध्वज स्टीकर काढून  मदतनिधी संकलन केले जाते. या प्रसंगी स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय,नांदेड येथे स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

 एकमेकांच्या हातात हात घेऊन मार्गक्रमण करणारी माणसाला माणूसपण शिकवणारी जगातील युवकांची शैक्षणिक चळवळ म्हणजे स्काऊट आणि गाईड होय. भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या मते भारताला विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच मूल्य व संस्कारयुक्त शिक्षणाची गरज आहे. याची प्रकर्षाने जाणीव झाली म्हणून आझाद साहेबांनी भारतामध्ये मूल्य व संस्कारयुक्त शिक्षण व चरित्र निर्माणाबरोबर राष्ट्रनिष्ठा देशप्रेम यांची शिकवण देणारी संस्था म्हणून स्काऊट आणि गाईड चळवळीचा पर्याय त्यांनी निवडला.

जिल्हयातील विविध शांळांमध्ये आज स्काऊट गाईड वर्धापन दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये कै. बळीराम पाटील विद्यालय,पेनूर ता. लोहा बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर सरस्वती विद्यामंदिर भोकर येथे कोरोना जनजागृतीवर आधारीत चित्रकला स्पर्धेचे तसेच निबंध स्पर्धा व भाषणातून स्काऊट-गाईड वचनाचा पुनरुच्चार करुन हा दिवस साजरा करण्यात आला.  

         या कार्यक्रमास स्काऊटर व्ही.जे. उकरंडे, दिपक वाघमारे, गाईडर श्रीमती सुजाता कांबळे,  जिल्हा संघटक स्काऊट/ 

गाईड दिगंबर करंडे, श्रीमती शिवकाशी तांडे कार्यालयीन कर्मचारी कैलास कापवार,साईनाथ ठक्कुरवार यांची उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *