समीक्षा………………………………..अनिष्ट रूढीला छेदणारी कविता : आम्ही भारताचे लोक


जगात सर्वश्रेष्ठ असलेल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात *आम्ही भारताचे लोक*… अशी करण्यात आली आहे. या प्रस्ताविकेचा उद्देश समोर ठेवून विद्यार्थीप्रिय शिक्षककवी, बाबुराव पाईकराव, हे भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचा तोच आशय घेऊन आम्ही भारताचे लोक ह्या कविता संग्रहाद्वारे काव्यरसिकांसमोर आले आहेत.  तेव्हा प्रथमतः त्यांचे हार्दिक स्वागत करतो. 


आम्ही भारताचे लोक या कविता संग्रहाचे कवी बाबुराव पाईकराव हे उपक्रमशील असे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत. तसेच ते विद्यार्थीप्रिय आणि संवेदनशील कवी आहेत. शाळेसोबतच ते रानावनात व शेतमळ्यात रमणारे कवी आहेत. उज्ज्वल भविष्याविषयी ते प्रचंड आशावादी आहेत. ते आपल्या पहिल्याच हे मानवा ! या कवितेत म्हणतात …


हे मानवा !तू नको करूकशाचा गर्ववैभव सारे राही येथेतुझ्या नंतर सर्व ……दु:खितांचे दु:ख वाटूनघेत जावेतेव्हांच सुखाचा आनंदमनमुराद लुटावे …
हा मनमुराद आनंद केंव्हा लुटता येतो, जेंव्हा माणसाच्या मनात कसल्याच प्रकारचा अहंकार नसतो. मनात कसल्याच प्रकारचा राग नसतो. कुणा बदलही द्वेष वाटत नाही. शुद्ध आचरण ठेवून सर्वांना प्रेम वाटतो, सर्वांशी मैत्री करतो. असाच माणूस सुखी जीवन जगून मनमुराद आनंद लुटत असतो. हा आनंद लुटत असताना कसलाच गर्व करायचा नाही. कारण सोबत काहीच येणार नाही. सारं काही इथेच सोडून जावं लागणार आहे. याचं भान ठेवलं पाहिजे. सुखी जीवन जगण्याचं बुद्ध तत्त्वज्ञान या  कवितेत कवीनं मांडलं आहे. 
मनमुराद आनंद घेण्यासाठी स्वच्या अहंकाराला जाळावं लागतं. अचरन शुद्ध ठेवावं लागतं.  राग, लोभ, मोह सोडावा लागतो, तसंच पैश्या पासूनही दूर राहावं लागतं. कारण पैसा या कवितेत कवी म्हणतो …
पैसा काय आहे ?पैसा एक बाजार आहे,तसाच तो मोठा आजार आहेपैसा सुख आहे, दु:ख आहे,रंक आणि राव यांची तो भूक आहे …

भूक, हा शब्दच महाभयंकर आहे. भूके पोटी माणूस काय करेल, काही सांगता येत नाही. ही भूक माणसाचं सर्वस्व हिरावून नेते. एखाद्या माणसाला जीवनातून हद्दपार करते. ही भूक शारीरिक असू शकते, बौध्दिक असू शकते, मानसिक असू शकते. ही भूक  शमविण्यासाठी, या भूके पासून अलिप्त होण्यासाठी ती जाणून घेण्यासाठी तिचं समूळ उच्चाटन करण्यासाठी, गुरूमंत्र घ्यावा लागतो. अर्थात धम्म जीवन जगावं लागतं. धम्म जीवन म्हणजे नितीमान जीवन. जगात सर्व प्रथम धम्म निती बुद्धाने शिकविली. म्हणून बुद्ध हे जगातील पहिले गुरू आहेत. गुरू शिष्याची परंपरा बुद्ध काळापासून सुरू झाली. म्हणून कवी विश्वगुरु या कवितेत म्हणतो …
बुद्धाचा प्रथम धर्मोपदेशसर्वांनाच ज्ञात आहेहीच गुरू पौर्णिमेची तरखरी सुरुवात आहे …
बुद्धाने जो प्रतित्यसमुत्पादाचा सिध्दांत मांडला आहे. तो सिध्दांत विज्ञानवादी आहे. कारणाशिवाय काहीही घडू शकत नाही. एका वस्तूंपासून दुसऱ्या वस्तूची निर्मिती होते. हे चक्र सतत फिरत असतं, म्हणून सारं काही अनित्य आहे. परिवर्तनशील आहे. नित्य असं काहीच नाही. जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. कुशल कर्म केले तर चांगलं फळ मिळेल व अकुशल कर्म केले तर वाईट फळ मिळेल, त्यास्तव देव, दैव, नशीब हे सर्व थोतांड आहे. या बुद्ध शिकवणीला अनुसरून कवी आपल्या नशिब या कवितेत म्हणतो …


अरे निष्क्रिय माणसानको भविष्यवाणी पाहूसामर्थ्य अंगी आहे तुझ्यानको विसंबून दैवावर राहू …
हे देव, दैव, नशीब, भविष्य, भाग्य यांच्या फे-यातून बाहेर निघून विज्ञानावर पाय ठेवून जगता आलं पाहिजे. हे ठामपणे सांगणारी हजारो वर्षे जुनी बुद्ध संस्कृती म्हणूनच बुद्ध संस्कृती मध्ये संस्काराला खुप महत्व आहे. संस्कारामुळे माणूस सुसंस्कृत होतो. आणि सुसंस्कृत माणसाच्या जगण्यात नितीमुल्य दडलेले असतात. सुसंस्कृत पीढी निर्माण करण्यासाठी योग्य वयातच मुलांच्या मनावर संस्कार पेरावे लागतात. आणि हे संस्कार पेरण्याचे काम गेल्या हजारो वर्षांपासून शिक्षक नावाचा गुरू नियमित करीत असतो. पण अराजकता, भ्रष्टाचारा, बेकारी, लाचारी, हुजरेगिरी इत्यादींनी आपले पाय पसरवून बस्तान मांडल्यामुळे पिढीच्या पिढी गारद होत आहे. बर्बाद होत आहे. तरी पण अजूनही शिक्षकवर्ग तग धरून आहे. संस्कार रुजविण्याची जिद्द त्याने सोडलेली नाही. म्हणूनच कवी आपल्या, गुरुमुल्य आणि आदर्श या कवितेत म्हणतो …


मुल्यहीन झालेत सारेसंस्कार इथे उरलेला नाहीशिक्षक अभियंता समाजाचाअजून तो हरलेला नाही ……
शिक्षक समाजाचा अभियंताघडवत असतो सुजाण पिढीज्ञानदिपाने काढीत असतोमनातील अनिष्ट रूढी …
मनातील अनिष्ट रूढी, परंपरा काढून सुजाण पिढी घडविण्यासाठी बुद्ध विचारातून, संत परंपरा असं सांगते की, आपल्या बोलण्यातून कोणाचीही भावना दुखावल्या जावू नये. तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले … म्हणून आपण जसे बोलतोत तसेच वागले पाहिजे. आपण वापरत असलेले शब्द दुधारी तलवारी सारखे असतात. म्हणूनच जाणकार म्हणतात, विचार करुन बोलावे, बोलून विचारात पडू नये. आणि संत कबीर म्हणतात, ऐैसी जगह बैठीए कोई न बोले उठ, और ऐैसी बात बोलीए कोई न बोले झुठ …आणि वडीलांची शिकवण, मनात कसल्याच प्रकारची जिद्द बाळगायची नाही, कोणाप्रतीही कटू शब्दांचा उच्चार करायचा नाही, आणि क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर मौन बाळगायला शिकलं पाहिजे. ही वडीलांची शिकवण कवीला लाखमोलाची वाटते. म्हणून कवी आठवणी, या कवितेत म्हणतो …
शब्दांवरती असावे बंधनत्यांना तलवारीची धार असतेविचाराअंती द्यावे उत्तरयातच माणूसकी उठून दिसते …


माणसांचा व माणसाच्या मनाचा सखोल विचार बुद्धा नंतर आजघडीला बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. आणि या बुद्ध विचारातूनच आम्ही भारताचे लोक या संविधानाच्या प्रस्ताविकेची निर्मिती झाली. जगात महान असणा-या भारत देशाच्या हरेक नागरिकास अर्पन केलेल्या या प्रस्ताविकेची मनोभूमी जाणून कवी,  आम्ही भारताचे लोक या कवितेत व्यक्त होताना म्हणतो …
आम्ही भारताचे लोक, म्हणूनसंविधानच भारतीयांना अर्पण केलेबाबासाहेब,बहुमोल आपल्या लेखणीनेप्रत्येक नागरिकास महान केले


आम्ही भारताचे लोक, या कविता संग्रहातील, मी पण, अभिवादन, वृक्षवल्ली, निर्वाण, व्यसन, चैत्य, महामानव, आदरांजली या कविता सुध्दा वाचकांचे मन वेधून घेतात. 
वा•डमयीनचाळ्यावर मात करून काळाच्या छातीवर ठसा उमटवण्यासाठी अधिकचं वाचन, चिंतन, मनन, व सभोवतालच्या परिस्धितीचं अवलोकन करावं लागेल.हे भान कवीनं जाणलं तर निश्चितच भविष्य उज्ज्वल आहे करीता आपल्या पुढील काव्य वाटचालीस, सम्यक सदिच्छा … !
———————————————————————

समीक्षक – अनुरत्न वाघमारे, नांदेड       

     मो. ९३२५८६८८२५
कविता संग्रहाचे नाव : ‘आम्ही भारताचे लोक’
कवी : बाबुराव पाईकराव, डोंगरकडा
प्रकाशक : सुमंत जोगदंडस्वयंदीप प्रकाशन, पुणे
एकूण पृष्ठ : ६५
किंमत : रु. ८०/- फक्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *