महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७नोव्हेंबर हा दिवस “विद्यार्थी दिवस”म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७आॅक्टोंबर २०१७ रोजी घेतला.अस्पृश्य जातीत जन्मझालेल्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेतांना खुप त्रास सहन करावा लागला,वर्गाच्या बाहेर बसून त्यांना ज्ञानग्रहण करावे लागले,तरी त्यांनी हार मानली नाही.
इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना शाळेत इतर विद्यार्थ्यापासून वेगळे बसवले जाई,शिक्षकांचे देखिल सहकार्य मीळत नसे,पाणी पिण्याच्या भांड्याला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती,तहान लागली तर शाळेच्या शिपायाची वाट पाहावी लागत असे,तो जर शाळेत उपस्थित नसेल तर दिवसभर पाणी मिळत नसे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्यार्थी जीवनात १८ तास अभ्यास करत असत.एलिफन्टन हायस्कूल मधून मॅट्रिकची परिक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
एखाद्या अस्पृश्य मुलाने एवढे यश मीळवणे त्या काळी खुप कठिण होते.स्वता:च्या जिद्द आणी मेहनतीने त्यांनी न्यायशास्त्र,अर्थशास्त्र,राजनितिज्ञ,तत्वज्ञ झाले.ते समाजसुधारकही झाले.दलित चळवळीला त्यांनी प्रेरणा दिली.महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे त्यांनी समर्थन केले.ते ब्रिटीश भारताचे मजूरमंत्री,स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौध्द धर्माचे पुनरुज्जीवक होते.अतिउच्च दर्जाची विदव्ता आणि ज्ञान जवळ असतांना त्यांनी स्वत:ला अजन्म विद्यार्थी समजले.शैक्षणिक ज्ञान ग्रहण करतांना त्यांना असंख्य अडचणी आल्या,पण त्यांनी त्याचा सामना केला.ते आदर्श विद्यार्थी ठरले.त्यामूळेच शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषीत केले.
७ नोव्हेंबर १९००रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेमध्ये प्रवेश घेतला.भिवा रामजी आंबेडकर या नावाने त्यांची नोंद आहे.१९१४ क्रमांकासमोर बाल भिवा ची स्वाक्षरी सुध्दा आहे.हा दस्ताऐवज शाळेने”ऐतिहासीक दस्ताऐवज”म्हणून जपून ठेवला आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल आहे.या घटनेने इतिहासाने देखिल कूस बदलली.आज त्यांच्यामूळेच भारतीय संविधानाचा सर्वात आदर्श संविधान म्हणून गौरव केला जातो.भारतीय समाजात त्यांनी स्वातंत्र्य,समता,बंधुता,न्याय ही मानवी मूल्ये रुजवली.
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी,त्यांच्यातील आभ्यासू विद्यार्थी प्रत्येकांनी आत्मसात करत आदर्श नागरिक घडावा हा आहे.विद्यार्थी हे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत,आणि शिक्षण हे उन्नतीचे एकमेव साधन आहे.याची जाण विद्यार्थ्यांना व्हावी,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात शिक्षणामुळे क्रांती घडली.कारण,ज्ञानाच्या जोरावरच भारतीय समाजात क्रांती घडवली.रूढी, परंपरा, अंधश्रध्दा, असमानता,गुलामगिरी च्या बेड्या तोडून डाॅ.बाबासाहेबांनी सर्वांना समान दर्जा दिला.अश्या या महान व्यक्तिमत्वाचा शाळाप्रवेश दिन आज”विद्यार्थी दिवस”म्हणून साजरा होतोय…समस्त”विद्यार्थी वर्गाला”विद्यार्थी दिवसाच्या”हार्दिक शुभेच्छा…!
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१