कंधार ; प्रतिनिधी
सध्या कोरोना महासंकट काळात सर्व शाळा बंद अन् शिक्षण सुरु आहे.या वर्षी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या सृजनशीलतेतून यंदाच्या दीपावलीच्या दीपोत्सवा निमित्य दि.7 नोव्हेंबर 2020 रोजी सुंदर अक्षर कार्यशाळेचे संचालक हरहुन्नरी कलावंत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांच्या 48 वा वाढदिवस साजरा करतांना मामा मित्र मंडळाचे संस्थापक मामा गायकवाड व साजिद कोचिंग क्लासचे संचालक प्रा.शेख साजिद सर यांच्या समर्थ हस्ते आकाश कंदीलाचे विमोचन करून लाॅक डाउन मध्ये अनेक कलाकृति हस्तकलेतून निर्माण झाल्या त्यांना पाहून उपस्थीत सर्वानी समाधान व्यक्त करुन कौतुक केले.
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करतांना सदिच्छापर मनोगतात मामा गायकवाड यांनी कलेचे तोंडभरुन करत हरहुन्नरी कला अंगीभुत आहे.स्वतः अपंग असतांना समाजाला पंग बनविण्याची धमक त्यांच्या कार्यात आहे.असे प्रांजळपणे मनोगतात मांडले,तर प्रा.शेख साजिद सरांनी मैत्रीचे जाळे विणनारा तो एक विणकर आहे.हे मला सरांच्या पहिल्या भेटीतच जाणवले.यांनी आपल्या मनोगतातून सदिच्छा दिल्या.
योगगुरु नीळकंठ मोरे सरांनी आपल्या भावनीक मनोगत मांडतांना मला माझ्या अपघाता नंतर घरातच बसावे लागले.तेंव्हा सर वर्षानुर्ष घरात बसुन राहातांनाचे जीवन कसे जगतात याचा मला आत्मानुभव प्रत्यक्ष मला जगतांना मला त्यांचे जीवन किती त्रासदायक असतांनाही ते कलेचे भक्त होवून कलावंताचे जीवन आनंदाने जगत. आयुष्याचा खरा आनंद घेत आहेत.या प्रसंगी भारतीय सैनिक जनार्धनजी भुत्ते सर उम्रजकर,मामा मित्रमंडळाचे बालाजी गायकवाड,बसवंते पानशेवडीकर,उम्रजचे तोरणे ब्रदर्स यांची उपस्थिती होती.
कार्यमात कलावंत दत्तात्रय एमेकर यांनी आभार मानतांना एक महिन्या पुर्वी माझ्या बाबांचे दु:खद निधन झाले.त्यांना आदरांजलीशअर्पण केल्या नंतर सर्व मित्र परिवारांच्या हिंमतीने मला संकट समयी दु:ख पेलण्याचे बळ मिळाले.आजच्या दिनी जन्मदिवस हा वाढदिवस खरा का खुड दिवस हा विचार मांडलो असतांना कोणाचे मन खुड दिवसाने दुखले असेल तर मला क्षमा करावे असा विचार माडले.
कार्यक्रमाचे आयोजक व सुत्रसंचारक आमचे मार्गदर्शक युगसाक्षी न्युजचे संपादक दिगंबरराव वाघमारे यांनी केले.हरहुनरी कलाशिक्षक दत्तात्रय एमेकर यांना युगसाक्षी न्युज परीवाराच्या वतीने भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.